मंत्री शिंदे यांच्या स्वास्थ्यासाठी आमदारांनी उघडले मंदिर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 06:35 IST2020-10-02T06:34:55+5:302020-10-02T06:35:20+5:30
मंत्री शिंदे यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ते सध्या होम क्वारंटाईन आहेत. कोरोनातून ते मुक्त व्हावेत म्हणून आ. पाटील यांनी मंदिर उघडून होम हवन केले.

मंत्री शिंदे यांच्या स्वास्थ्यासाठी आमदारांनी उघडले मंदिर!
बोदवड (जि. जळगाव) : कोरोनामुळे देशातील सर्व धार्मिक स्थळे बंद असताना मुक्ताईनगरचे आमदार चंद्र्रकांत पाटील यांनी बोदवड तालुक्यातील प्रसिद्ध शिरसाळा हनुमान मंदिर गुरुवारी उघडून बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी चक्क होम हवन व पूजा तसेच आरतीही केली. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला.
मंत्री शिंदे यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ते सध्या होम क्वारंटाईन आहेत. कोरोनातून ते मुक्त व्हावेत म्हणून आ. पाटील यांनी मंदिर उघडून होम हवन केले. तसा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियात जोरदार टीका झाली. तर मंदिराच्या प्रांगणात होम व आरती केली. नियमांचे पालन केले आहे, जो व्हिडीओ व फोटो व्हायरल होत आहे तो जुना असल्याचे पाटील म्हणाले.