शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता वायरमनचा पद्मालयच्या जंगलात मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 23:39 IST

बोरगाव, ता. धरणगाव येथील रहिवासी ज्ञानेश्वर कृष्णा चव्हाण (२३) या तरूणाचा मृतदेह सात दिवसांनी आढळला आहे.

ठळक मुद्देजंगलातच घेतला गळफास

लोकमत न्यूज नेटवर्क

एरंडोल : बोरगाव, ता. धरणगाव येथील रहिवासी ज्ञानेश्वर कृष्णा चव्हाण (२३) हा तरुण एरंडोल येथे वीज महावितरण कंपनीत जवळपास ३ वर्षांपासून झिरो वायरमन म्हणून काम करीत होता. तो जवळपास सात-आठ दिवसांपूर्वी घरून निघाला होता. तो आज येईल, उद्या येईल, म्हणून आईवडिलांसह घरातील इतर लोक वाट पाहत असताना शनिवारी सकाळी पद्मालयच्या जंगलात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. 

हे वृत्त कळताच ज्ञानेश्वरच्या आईवडिलांनी व कुटुंबातील सदस्यांनी हंबरडा फोडला. विशेष हे की त्याचे प्रेत कुजलेल्या स्थितीत आढळून आले. त्याने आत्महत्या पाच ते सहा दिवसांपूर्वी केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक कयास आहे. 

कुजलेल्या मृतदेहाची दुर्गंधी परिसरात पसरल्याची माहिती पद्मालय व गलापूर येथील ग्रामस्थांना कळल्यावर त्यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला याबाबत कळविले. त्याठिकाणी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहायक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, संदीप सातपुते, अकील मुजावर, जुबेर खाटीक, संदीप पाटील यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. त्यावेळी गलापूरचे माजी सरपंच शेख आरिफ पठाण, उपसरपंच पद्मालय अर्जुन मोरे, आबा वाणी यांनी घटनास्थळी पोलिसांना सहकार्य केले.ग्रामीण रुग्णालयातील डॉ.मुकेश चौधरी यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. ज्ञानेश्वर हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल जुबेर खाटीक व अकील मुजावर हे पुढील तपास करीत आहेत.

पोलिस निरीक्षक बालंबाल बचावले

दरम्यान मृतदेह अशा ठिकाणी होता, ज्याठिकाणी कोणीही जाऊ शकत नव्हते. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव हे स्वतः खाली उतरत असताना दरीत कोसळण्यापासून बालंबाल वाचले. त्यांना आबा वाणी यांनी वाचवले. मृताच्या खिशात दुचाकीची चावी, मोबाइल, पाकीट व ओळखपत्र मिळून आले. 

टॅग्स :JalgaonजळगावErandolएरंडोलDeathमृत्यूPadmalaya पद्मालयाforestजंगल