शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:17 IST

जळगाव : ज्येष्ठ शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती तसेच मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ...

जळगाव : ज्येष्ठ शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती तसेच मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त मंग‌‌‌‌ळवारी शहरातील विविध शाळांध्ये त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शाळा बंद असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रम होऊन, विद्यार्थांना डॉ.कलाम यांची माहिती देण्यात आली.

राज प्राथमिक विद्यालय

मेहरूण परिसरातील राज प्राथमिक व माध्यामिक विद्यालयात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे प्राथमिकचे मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यानंतर त्यांनी विद्यार्थांना डॉ. कलाम यांच्या कार्याची माहिती दिली. सुत्रसंचालन एस. ए. खंडारे यांनी तर आभार एस. ए. पाटील यांनी मानले.

जैन माध्यमिक विद्यालय

कै.मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालयात ज्येष्ठ शिक्षिका मोहिनी चौधरी यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमात कार्तिक दुसाने, दीपा गुप्ता, संदेश तिवारी, प्र‌शांत कवळे, प्रणाली गायकवाड, रजनी तायडे, कुणाल पाटील, कृष्णा मराठे, आशिष राठोड, शिफा शेख, सिमरन तडवी, खुशबू राठोड या विद्यार्थांना डॉ.कलाम यांच्याबद्दल माहिती दिली. यशस्वीतेसाठी रोहिणी सोनवणे, अर्चना धांडे, धनश्री फिरके, अविनाश महाजन, नरेश कोळी, तुषार वानखेडे, दीपक भोळे यांनी परिश्रम घेतले.

सुजय विद्यालय

येथील सुजय महाजन प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापिका अर्चना सुर्यवंशी यांच्याहस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. यानंतर गौरव सरोदे, रविराज बंजारा या विद्यार्थांनी डॉ. कलाम यांच्य कार्याबद्दल भाषण केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हितेश पाटील, पूजा तिवटे, मुक्ता देशमुख आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.

मानव सेवा विद्यालय

मानव सेवा विद्यालयात मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी यांच्याहस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यानंतर इयत्ता ८ ते १० वीच्या विद्यार्थांनी डॉ.कलाम यांच्यावर ऑनलाईन निबंध सादर केले. यावेळी माया अंबटकर, मुक्ता पाटील आदी शिक्षकवर्ग उपस्थित होते.

जय दुर्गा माध्यामिक विद्यालय

जय दुर्गा प्राथमिक व माध्यामिक विद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे मुख्याध्यापक सागर कोल्हे व ज्येष्ठ शिक्षिका ज्योती पाटील यांच्याहस्ते प्रतिमा पुजन करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थांनी ऑनलाईन द्वारे या कार्यक्रमात सहभाग घेतला.