शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

सार्वजनिक बांधकाम विभागातील घोळाबाबत मंत्र्यांनी पाळले मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 13:16 IST

निविदेसाठी बनावट ई-मेल

ठळक मुद्देअधिकाऱ्यांवरील कारवाई दाबण्याचा प्रयत्नसर्व दोषींची चौकशी होणार -अधीक्षक अभियंता

जळगाव : सार्वजनिक बांधकाम जळगाव जिल्हा उत्तर विभागातील पुलाच्या बांधकामाच्या ५५ लाखांच्या कामाच्या ई-निविदेत कार्यकारी अभियंता कार्यालयातीलच संगणकाचा गैरवापर करून बनावट ई-मेल व खोटे दस्तावेज तयार करुनही अधिकारी, कर्मचाºयांवरील कारवाई दाबण्याचा प्रयत्न होत आहे.स्वच्छ कारभाराचा दावा करणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे मात्र याप्रकरणी मौन बाळगून आहेत. त्यामुळे ही कारवाई दडपली जाण्याचीच शक्यता अधिक असल्याची चर्चा आहे.सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग जळगाव यांनी २२ जुलै २०१६ रोजी ४१ कामांची आॅनलाईन निविदा सूचना प्रसिद्ध केली. निविदा भरण्याची अंतिम मुदत २६ आॅगस्ट २०१६ ही होती. त्या ४१ कामांपैकी अनुक्रमांक १९ वर बोदवड तालुक्यात राज्य मार्ग क्र.६ ते तळवेल -जुनोने दिगर-आमदगाव-रूईखेडा रस्ता प्रजिमा-२५ वर १९/९३० व २०/८७३ मध्ये लहान पुलाचे बांधकाम करण्याच्या ५४.९३ लाखांच्या कामाचा समावेश होता. मात्र यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी व मक्तेदार यांनी हातमिळवणी करून बनावट कागदपत्र सादर करून मर्जीतील ठेकेदाराला काम दिल्याची व भ्रष्टाचार केल्याची तक्रार विजयकुमार नामदेव काकडे मु.चिखली पो. घोडसगाव ता. मुक्ताईनगर यांनी केली होती.ही तक्रार जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील भ्रष्टाचार निर्मूलन समितीपुढे ठेवण्यात आली. त्यात उत्तरप्रदेशातील हरिद्वार येथील सहगल इंडस्ट्रीजकडून मशिनरी खरेदी केल्याची खोटी बिले जोडली आहे.बांधकाम मंत्र्यांच्या स्वच्छ प्रतिमेचे काय?सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री हे नेहमीच पारदर्शक कारभाराबद्दल बोलत असतात. मात्र आता त्यांच्याच खात्याच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयातून बनावट ई-मेल मक्तेदार बनवतो. ते पोलिसांच्या अहवालात सिद्ध होते, तरीही विभागीय चौकशीसाठी पोलीस चौकशी पूर्ण होण्याची वाट पाहत असल्याचे कारण पुढे केले जाते, हे संशयास्पद आहे. एवढेच नव्हे तर फिर्यादीतही अधिकारी, कर्मचाºयांच्या सहभागाचा विषय सोयीस्करपणे टाळला जातो. यामुळे बांधकाममंत्र्यांच्या स्वच्छ कारभाराबद्दलच संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.सर्व दोषींची चौकशी होणार -अधीक्षक अभियंतायाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, पोलीस तपास सुरू असून पोलिसांनी उत्तर विभाग कार्यालयातील सर्व १४ संगणक जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या चौकशीत दोषी म्हणून ज्यांची-ज्यांची नावे समोर येतील, त्या सर्वांची विभागीय चौकशी केली जाईल.वरिष्ठपातळीवरून अधिकाºयांवर दबावयाप्रकरणात अधिकाºयांवरच वरिष्ठपातळीवरून दबाव असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच अधिकारी या प्रकरणातील दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे.अहवालानंतरही कारवाईसाठी प्रतीक्षापोलिसांच्या सायबर सेलचा अहवाल प्राप्त होऊन त्यात कार्यकारी अभियंता उत्तर विभाग यांच्या कार्यालयातील संगणकावरूनच हा बनावट ई-मेल तयार करण्यात आल्याचे उघड होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकरणाची अद्यापही गांभीर्याने दखल घेतलेली नाही. याप्रकरणी तातडीने तत्कालीन अधीक्षक अभियंता दाभाडे, कार्यकारी अभियंता नारखेडे यांच्यासह कर्मचाºयांची विभागीय चौकशी होणे व दोषींवर कारवाई होणे गरजेचे असताना त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव