मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला; रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 18:39 IST2025-03-27T18:34:57+5:302025-03-27T18:39:54+5:30
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला आहे. रक्तस्त्राव झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला; रुग्णालयात दाखल
वरणगाव येथील शहीद जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर यांना मानवंदना देण्यासाठी आलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. रक्तस्त्राव झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मंत्री गिरीश महाजन वरणगाव शहरात दाखल झाले व शाहिद जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मिल्ट्रीच्या ट्रक मध्ये उंचावर जंप मारून चढले, पण ट्रक चा वरचा रॉड थेट त्यांच्या डोक्याला लागला. यावेळी रक्तस्राव झाला. जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्यांना चक्कर आली. त्याच स्थित मंत्री महाजन यांनी शाहिद जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिव देहाला पुष्पचक्र अर्पण केले व अभिवादन केले. मंत्री महाजन ट्रक वरून खाली उतरले डोक्याचे रक्त थांबत नसल्याने उपचारासाठी उपस्थित माजी नगराध्यक्ष सुनील काळे, कामगार नेते मिलिंद मेढे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, शेख आखलाक यांनी आग्रह करून तातडीने हॉस्पिटलला दाखल केले.
उद्धव ठाकरे हे आधुनिक जगातले औरंगजेब, त्यांनी वेगळे काय केले...; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका
मंत्री गिरीश महाजन त्याच स्थितीत शहिद जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पत्नीला व परिवाराला जाऊन भेटले. त्यांचं सांत्वन केले, काळजी करू नका. देश सेवा करीत असताना अर्जुन ला वीर मरण आले, याचे दुःख आमच्या मनात आहे. मात्र मी व राज्य सरकार बाविस्कर यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे असे सांगितले. मंत्री महाजन यांच्या डोक्याला जबर मार लागला असताना सुद्धा पुढे अंत्ययात्रेत तिरंगा सर्कल पर्यंत चालत गेले. तिथे हजारो वरणगाव करांच्या उपस्थित मानवंदना दिली. डॉ. निलेश पाटील यांनी उपचारासाठी पुढे जाण्याचा सल्ला दिला मात्र मंत्री गिरीश महाजन यांनी नाकारत तातडीने नाशिक येथे महत्वाची बैठक असल्याने मला जावे लागणार आहे असे सांगून त्याच स्थितीत मंत्री गिरीश महाजन तातडीने वाहनाने नाशिक कडे रवाना झाले.