शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मतदान करून राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचा जळगावात रॅलीद्वारे संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 13:07 IST

‘रोटरी’तर्फे मतदान जनजागृती

जळगाव : शहरातील रोटरी क्लब जळगाव परिवारातर्फे शुक्रवार, १८ रोजी सकाळी शिवतीर्थ मैदानापासून मतदान जनजागृती रॅली काढण्यात येऊन त्याद्वारे मतदान करण्याचे शहरवासीयांना आवाहन करण्यात आले. या सोबतच विविध चौकात जनजागृती पत्रकांचे वितरण करीत मतदानासारख्या राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचा संदेश देण्यात आला.शिवतीर्थ मैदानावर निवडणूक निरीक्षक डॉ. पार्थसारथी मिश्रा, रुपक मुजुमदार, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, प्रेसिडेंट एन्क्लेल्यू डॉ.राजेश पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलावळे, तहसीलदार वैशाली हिंगे, सहप्रांतपाल डॉ. तुषार फिरके, अनिल एम.अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ झाला. रॅलीचे नेतृत्व रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष कॅप्टन मोहन कुलकर्णी, मानद सचिव संदिप शर्मा, रोटरी वेस्टचे अध्यक्ष डॉ. सुशीलकुमार राणे, सचिव सुनील सुखवाणी, रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष डॉ.राहुल मयूर, सचिव सुशील राका, रोटरी गोल्डसिटीचे अध्यक्ष संजय दहाड, मानद सचिव राहुल कोठारी, रोटरी ईस्टचे अध्यक्ष विनोद पाटील, रोटरी स्टारचे सचिन करण ललवाणी, रोटरी मिडटाऊनच्या माजी अध्यक्षा डॉ.सुमन लोढा, इनरव्हिल न्यू जेनच्या अध्यक्षा वैशाली सुरतवाला, रोटरॅक्टचे डी.आर.आर. शंतनू अग्रवाल, रोटरॅक्ट वेस्टचे अध्यक्ष अमृत मित्तल, रोटरॅक्ट देवकर कॉलेजच्या अध्यक्षा पूनम सोनार आदींनी नेतृत्व केले. शिवाजी महाराज पुतळ््यापासून नेहरू चौक, टॉवर चौक, चौबे मार्केट, सुभाष चौक, पांडे डेअरी चौक, सिंधी कॉलनी चौक, शिरसोली नाका, मोहाडी रोड, आदर्श नगर, गणपती नगर, सागर पार्क, भाऊंचे उद्यान, महाबळ रोड मार्गे रली काढण्यात येऊन मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे समारोप झाला.या रॅलीत सर्व रोटरी क्लब, इनरव्हील क्लब व रोटरॉक्ट क्लबचे सदस्य दुचाकी, चारचाकी वाहनधारक रोटरी सदस्य सहभागी झाले होते. त्यांनी जनजागृती पत्रकांचे विविध चौकात वितरण केले.

टॅग्स :Jalgaonजळगाव