जळगाव जामोद येथील राधे कोल्ड्रिंक्सला भीषण आग; दुकान जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 07:46 IST2025-05-12T07:46:01+5:302025-05-12T07:46:17+5:30
पहाटेची वेळ असल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही तसेच हवा आणि वादळ नसल्यामुळे इतरत्र पसरली नाही.

जळगाव जामोद येथील राधे कोल्ड्रिंक्सला भीषण आग; दुकान जळून खाक
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद: स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामधील राजू कोल्ड्रिंक्स या प्रतिष्ठानला आज दिनांक 12 मे रोजी पहाटे पाच वाजताची दरम्यान प्रचंड मोठी आग लागली या आगीमुळे लाखोंच नुकसान झाले असून संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. तर इतर दुकानांनाही हानी पोहोचली आहे.
याबाबत माहिती अशी की पहाटे पाच वाजता जे दरम्यान ही आग दिसून आली.पोलीस स्टेशनला लागूनच असलेल्या प्रतिष्ठान मध्ये आग लागल्यामुळे पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सुद्धा या ठिकाणी धावत आले तात्काळ जळगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला प्रचारण करण्यात आले परंतु टँकर मध्ये पाणी कमी असल्यामुळे तेवढे पाणी मारून पुन्हा टँकर पाण्यासाठी गेला त्यामुळे आगीने भीषण धारण केले. पहाटेची वेळ असल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही तसेच हवा आणि वादळ नसल्यामुळे इतरत्र पसरली नाही. त्यानंतर शेगाव येथील अग्निशमन दला सुद्धा प्रचारण करण्यात आले होते सात वाजता आग विझविण्यात यश आले. तसेच आगीदरम्यान दोन-तीन वेळा स्फोट झाले.