चार महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या विवाहितेने जाळून घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 12:55 IST2018-08-25T12:50:42+5:302018-08-25T12:55:46+5:30

विवाहितेचे चाळीसगाव तालुक्यातील माहेर

Married married four months ago got married | चार महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या विवाहितेने जाळून घेतले

चार महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या विवाहितेने जाळून घेतले

ठळक मुद्दे ५० टक्के भाजली२४ आॅगस्ट रोजी जळगाव जिल्हा रुग्णालयात

जळगाव : पती-पत्नीचे भांडण झाल्याने माया संदीप शिंदे (२०, रा. गणेशपूर, वाशिम) या चार महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या विवाहितेने जाळून घेतले. चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथील माहेर असलेली ही विवाहिता या घटनेत ५० टक्के भाजली असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिनाभरापूर्वी गणेशपूर येथे ही घटना घडली होती, शुक्रवारी तिला जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या बाबत विवाहितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, चार महिन्यांपूर्वीच गणेशपूर येथील संदीप शिंदे यांच्याशी मायाचे लग्न झाले होते. लग्न झाले तेव्हापासून तिला त्रास दिला जात असल्याचे विवाहितेच्या आईचे म्हणणे आहे. महिनाभरापूर्वी घरात पतीने पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. त्या वेळी पती-पत्नीत वाद झाला. त्यानंतर या विवाहितेने जाळून घेतले.
त्यानंतर तिला आकोला येथे रुग्णालयात हलविण्यात आले. तेव्हापासून तिच्यावर तेथे उपचार सुरू होते. शुक्रवार, २४ आॅगस्ट रोजी तिला जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

Web Title: Married married four months ago got married