'आता माघार नाही', मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 12:50 IST2023-12-03T12:49:28+5:302023-12-03T12:50:01+5:30
Manoj Jarange-Patil: जळगाव जिल्ह्यात जवळपास साडेतीन लाख कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असा निर्धार मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे - पाटील यांनी आज रविवारी चाळीसगाव येथे व्यक्त केला.

'आता माघार नाही', मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा
- संजय सोनार
चाळीसगाव (जि.जळगाव) : जळगाव जिल्ह्यात जवळपास साडेतीन लाख कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असा निर्धार मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे - पाटील यांनी आज रविवारी चाळीसगाव येथे व्यक्त केला. जरांगे यांच्या खान्देशातील दौऱ्याला आज रविवारी चाळीसगाव येथून सुरुवात झाली. चाळीसगाव महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारवरही जोरदार शब्दात टीका केली