कोळी समाजातर्फे केला अनेकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:16 IST2021-09-13T04:16:16+5:302021-09-13T04:16:16+5:30

मुक्ताईनगर : कोळी समाज हा आर्थिक व राजकीय दृष्टीने पुढे आला आहे; पण आता समाजाला शैक्षणिकदृष्ट्याही मोठे होणे गरजेचे ...

Many were felicitated by the Koli community | कोळी समाजातर्फे केला अनेकांचा सत्कार

कोळी समाजातर्फे केला अनेकांचा सत्कार

मुक्ताईनगर : कोळी समाज हा आर्थिक व राजकीय दृष्टीने पुढे आला आहे; पण आता समाजाला शैक्षणिकदृष्ट्याही मोठे होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कोळी समाजाचे नेते तसेच माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी मुक्ताईनगर येथे आयोजित समाजातील गुणवंत विद्यार्थी व नवनियुक्त सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या सत्कारप्रसंगी केले.

आदिवासी कोळी युवक मंचने हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, मुक्ताईनगर येथे रविवारी आयोजित केला होता. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे, रावेरच्या पंचायत समितीच्या सभापती कविता हरलाल कोळी, जिल्हा परिषोचे सदस्य नीलेश पाटील, नगरसेवक नीलेश शिरसाठ, ॲड. वसंत भोलाणकर, डॉ. दिवाकर पाटील, नितीन कांडेलकर, गोपाळ सोनवणे, संजय कांडेलकर, चंद्रकांत भोलाणे, संजय कोळी, सुरेश कोळी, हरलाल कोळी, राजेंद्र कांडेलकर, गुणवंत पिवटे, संतोष कोळी व कोळी युवक मंचचे अध्यक्ष पंकज कोळी, आदी उपस्थित होते.

उमेश तायडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शंकर मोरे, उमेश तायडे, ॲड. संतोष कोळी, शुभम तायडे, विष्णू कोळी, शुभम कोळी, भूषण कोळी, रूपेश कोळी, अर्जुन सांगळकर, अक्षय ठाकरे, आदर्श भोलाणे, सौरभ कोळी, मनोज तायडे, कृष्णा कोळी, सुकलाल सांगळकर, लखन कोळी, गोकुळ भोलाने यांनी परिश्रम घेतले.

मुक्ताईनगर येथे आदर्श शिक्षिका आशा दिवाकर पाटील (कोळी) यांचा गौरव करताना चंद्रकांत सोनवणे. सोबत अशोक कांडेलकर, आदी उपस्थित होते. (छाया : विनायक वाडेकर)

Web Title: Many were felicitated by the Koli community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.