ज्वारी व मका खरेदी केंद्रात अनेकांचा रात्री मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 22:43 IST2021-04-05T22:43:11+5:302021-04-05T22:43:37+5:30
ज्वारी व मका खरेदी केंद्रात माल विक्रीबाबत नाव नोंदणीसाठी अनेकांनी कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडवत केंद्र परिसरातच रात्री मुक्काम ठोकला होता.

ज्वारी व मका खरेदी केंद्रात अनेकांचा रात्री मुक्काम
लोकमत न्यूज नेटवर्क
रावेर: येथील ज्वारी व मका खरेदी केंद्रात माल विक्रीबाबत नाव नोंदणीसाठी अनेकांनी कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडवत केंद्र परिसरातच रात्री मुक्काम ठोकला होता.
रब्बीच्या ज्वारी व मका खरेदी केंद्रात सोमवारी सकाळी होणाऱ्या नाव नोंदणीकरीता काही सामान्य शेतकरी स्वत : तर काही शेतकर्यांनी सालदार वा मजूरांना रोंजदारीने रावेर तालूका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे कार्यालयासमोर रविवारी रात्रीपासूनचं कोरोना साथरोग नियंत्रण अधिनियम १८८ अन्वये लागू केलेल्या संचारबंदीचे उल्लंघन करून अंथरूण व पांघरूणासह नाव नोंदणीत अग्रक्रम पटकाविण्यासाठी मुक्कामी झोपवल्याने एकच खळबळ उडाली आहे.
किंबहुना, कोरोनाच्या संचारबंदीत रात्री तालूका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संघाच्या प्रांगणातचं मुक्काम ठोकत तब्बल ३४८ शेतकर्यांनी आजच्या पहिल्याच दिवशी नोंद झाली असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.