कुटुंबीय झोपलले असताना किचनमध्ये घेतला गळफास
By विलास बारी | Updated: March 10, 2024 20:00 IST2024-03-10T19:59:52+5:302024-03-10T20:00:02+5:30
शिरसोली येथील तरुणाची आत्महत्या

कुटुंबीय झोपलले असताना किचनमध्ये घेतला गळफास
विलास बारी/ शिरसोली-जळगाव : रात्री घरात सर्वजण झोपलेले असताना स्वयंपाक घरात जाऊन रमेश उर्फ रवींद्र निंबा पाटील (३५, रा. शिरसोली) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार १० रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गावात फोटोग्राफीचा व्यवसाय करणारा रमेश पाटील हे दोन दिवसांपासून काहीतरी विवंचनेत होते. रविवार, १० मार्च रोजी मध्यरात्री घरातील स्वयंपाक घराचा दरवाजा बंद करून गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नीला जाग आली, त्यावेळी पती न दिसल्याने त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी स्वयंपाक घराचा दरवाजा आतमधून बंद होता. त्यांनी शेजारच्या नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडला असता पाटील हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले.
पोलिस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जितेंद्र राठोड करीत आहेत. मयताच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे.