अंगावर ट्रॅक्टर घातल्याने मांडळ तालुक्यातील एकाचा मृत्यू 

By संजय पाटील | Updated: January 17, 2023 11:13 IST2023-01-17T11:13:33+5:302023-01-17T11:13:48+5:30

दोन दिवसांपूर्वी जयवंत कोळी यांनी अवैध वाळू वाहतूक  रोखण्याचा प्रयत्न केला होता.

Man dies after being run over by a tractor in Mandal taluka | अंगावर ट्रॅक्टर घातल्याने मांडळ तालुक्यातील एकाचा मृत्यू 

अंगावर ट्रॅक्टर घातल्याने मांडळ तालुक्यातील एकाचा मृत्यू 

अमळनेर जि.जळगाव : तालुक्यातील मांडळ येथे एकाच्या अंगावर ट्रॅक्टर चालवल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

मांडळ येथे भाल्या नाला परिसरात शेती असलेले जयवंत यशवंत कोळी (३६) हे रात्री शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. सकाळी त्यांच्या अंगावरून ट्रॅक्टर नेल्याने ते गंभीर जखमी झाल्याची माहिती एकाने गावात कळवली. नातेवाईक आणि इतर लोकांनी त्यांना प्रथम स्थानिक डॉक्टरांकडे उपचारसाठी नेले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना धुळे जिल्हा  रुग्णालयात नेण्यात आले. तेथे नेल्यावर थोड्या वेळात त्याचा मृत्यू झाला. 

दरम्यान,  दोन दिवसांपूर्वी जयवंत कोळी यांनी अवैध वाळू वाहतूक  रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून वाद निर्माण झाले होते. आज देखील घटनास्थळी वाद झाले, अशी चर्चा आहे. हा अपघात की खून याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. तक्रारी करूनही महसूल खात्याचे अवैध वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष झाल्याने जयवंत कोळी यांचा जीव गेल्याची चर्चा आहे. मारवड पोलिसांना माहिती मिळताच सहाययक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे घटनास्थळी पोहोचले आहेत.

Web Title: Man dies after being run over by a tractor in Mandal taluka