शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

गावठी पिस्तूल बनवणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 23:30 IST

आणखी १० ते १५ कट्टे मिळण्याची शक्यता । अमळनेर, जळगाव भुसावळात पिस्तूल विकल्याची माहिती

अमळनेर : शहरात गावठी पिस्तूल विकायला येताना पोलिसांच्या धाकाने अमळगाव- जळोड दरम्यान पुलाखाली ४० हजार रुपये किमतीचे २ गावठी पिस्तूल लपवणाऱ्या मध्यप्रदेशातील एका आरोपीला एलसीबी पोलिसांनी शनिवारी अटक केली.विशेष म्हणजे, त्याच्याकडून अमळनेर, भुसावळ व जळगाव शहरात विकले गेलेले १० ते १५ पिस्तूल व आणखी आरोपी मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.गुरुचरण अवसिंग बर्नाला, रा. उमरटी, ता.वरला.जि. बडवानी याला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस निरीक्षक बी.जी.रोहम यांना मिळालेल्या माहितीवरून पोलीस कर्मचारी अशोक महाजन, नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, सुनील दामोदरे, मनोज दुसाने, प्रवीण हिवराळे, किरण धनगर, महेश पाटील, दीपक शिंदे यांच्या पथकान ही कारवाई केली. हे पथक ठरवलेल्या ठिकाणी पोहचताच पोलिसांना पाहिल्यावर संशयितरित्या पळत असताना त्यास चोपडा येथून २२ रोजी दुपारी १ वाजता ताब्यात घेतले. त्याला चौकशीसाठी जळगावला नेले असतात्याने २२ रोजी अमळनेर शहरात गावठी पिस्तूल विकायला जात असताना पोलीस आल्याची माहिती मिळताच अमळगाव पासून १ किमी अंतरावर जळोदकडे जाताना एका पुलाखाली पिस्तूल लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्यावरून मारवड पोलीस स्टेशनचे विजय साळुंखे, सुनील आगवणे यांना घेऊन घटनास्थळावरून ४० हजारांचे दोन पिस्तूल ताब्यात घेतले असून मारवाड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहेत.

मोठे रॅकेट...गुरुचरण सिंग हा आपल्या कुटुंबियांसोबत स्वत: गावठी पिस्तूल बनवतो आणि विकतो. त्याने अमळनेर, भुसावळ आणि जळगाव शहरात किमान १० ते १५ पिस्तूल विकल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.