Maharashtra Election 2019 :...मग पाच वर्षात शिवसेनेने काय केले? शरद पवार यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 11:22 AM2019-10-09T11:22:27+5:302019-10-09T11:24:24+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : बुधवारी सकाळी जळगावातील राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांचा शिवसेनेवर घणाघात

Maharashtra Election 2019 :... So what did Shiv Sena do in five years? - Sharad Pawar | Maharashtra Election 2019 :...मग पाच वर्षात शिवसेनेने काय केले? शरद पवार यांचा सवाल

Maharashtra Election 2019 :...मग पाच वर्षात शिवसेनेने काय केले? शरद पवार यांचा सवाल

Next

जळगाव - आता ७/१२ कोरा करणार आहात, मग पाच वर्षे सत्तेत राहून शिवसेनेने  काय केले, अशी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. काल झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेत आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते, त्यावरून शरद पवार यांनी शिवसेनेला हा टोला लगावला आहे. 

बुधवारी सकाळी जळगावातील राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  ते म्हणाले की, ''निवडणुकीत पाच वर्षात काय केले आणि पुढे काय करणार हे सांगायचे असते. आता माझा ७/१२ कोरा झाला काय? हे मला घरी जाऊन पहावे लागेल.''
दरम्यान, ''भाजप - सेनेला रोखण्यासाठी मुक्ताईनगरसह दोन - तीन ठिकाणी  बंडखोर उमेदवारांना पाठिंबा दिला असल्याचे पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने कोथरुड मतदारसंघातून माघार घेतली होती. त्यानंतर, खडसेंच्या कन्या निवडणूक लढवत असलेल्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनीही धक्कादायक माघार घेतली आहे. पक्ष आदेश असल्याने माघार घेण्याचे त्यांनी सांगितले. याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना पवारांनी याचं कारण सांगितलं. राज्यातील काही मतदारसंघातून अशा उमेदवारी माघार घेण्यात आल्याचे पवार म्हणाले. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे मुक्ताईनगर  विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र बदलले असून, शिवसेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत निंबा पाटील यांची आता माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या भाजप उमेदवार रोहिनी खडसे यांच्यात सरळ-सरळ लढत रंगणार आहे. दुसरीकडे पक्षाकडून माघारीचे आदेश आल्याने स्वत: रवींद्र पाटील हे पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाकडे पाठविणार असल्याची भूमिका मांडली होती. तर राष्ट्रवादीचे जिल्हा पदाधिकारी विनोद तराळ यांनी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी राजीनामा देत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर शरद पवार यांनी आपल्या जळगाव दौऱ्यात विधासनभा निवडणुकांमधील माघार याबद्दल भाष्य केले. 

 

Web Title: Maharashtra Election 2019 :... So what did Shiv Sena do in five years? - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.