शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

जळगावमध्ये उद्धव सेनेकडून वैशाली सूर्यवंशी, उन्मेष पाटील यांना ए.बी. फॉर्म?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 12:24 IST

Maharashtra Assembly Election 2024 Unmesh Patil And Vaishali Suryawanshi : महाविकास आघाडीकडून जिल्ह्यातील ११ मतदारसंघाच्या जागावाटपासह उमेदवारांच्या नावांबाबत अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही.

जळगाव : महाविकास आघाडीकडून जिल्ह्यातील ११ मतदारसंघाच्या जागावाटपासह उमेदवारांच्या नावांबाबत अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, उद्धव सेनेकडून पाचोरा मतदारसंघात वैशाली सूर्यवंशी, तर चाळीसगाव मतदारसंघात उन्मेष पाटील यांना ए.बी. फॉर्म देण्यात आल्याची माहिती उद्धव सेनेच्या विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. उन्मेश पाटील यांनी या वृत्तास दुजोरा दिला. 

उद्धव सेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी सोमवारपासून मुंबईत ठाण मांडून आहेत. त्यात उद्धव सेनेकडून जिल्ह्यातील पाचोराचाळीसगाव या दोनच जागांवरील उमेदवारांना ए.बी. फॉर्म दिले आहेत, अशी माहिती मिळाली आहे. 

सोशल मीडियावर पोस्ट, व्हिडीओ व्हायरल करून बंडाची तयारी... 

• भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर आता भाजपकडून इच्छुक असलेल्या अनेक इच्छुकांनी बंडाचा झेंडा हातात घेण्याची तयारी केली आहे. याबाबत भाजप पदाधिकारी व नेत्यांबाबतच्या काही पोस्ट समर्थकांकडून सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत. त्यात माजी खासदार ए. टी. पाटील यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यात मी पुन्हा जनतेच्या सेवेसाठी तत्पर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

• तर दुसरीकडे जळगाव शहरातून माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांच्याबाबतची 'मी लढणारच अशी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर पाचोरा मतदारसंघातून भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांचीही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

• त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत बंडाचे झेंडे घेणाऱ्यांची मनधरणी करण्याचे आव्हान भाजप नेत्यांसमोर राहणार आहे. 

एका जागेचा तिढा सुटल्यानंतर, उभा राहतोय दुसऱ्या जागेचा तिढा 

• महाविकास आघाडीच्या जागा वाटपात जळगाव जिल्ह्यातील ११ जागांबाबत सुरुवातीपासूनच रस्सीखेच सुरु आहे. 

• उद्धव सेना, शरद पवार गट व काँग्रेसकडून काही ठराविक जागांवरील आग्रह कायम आहे. त्यामुळे जागावाटपाचा कोणताही निर्णय होत नाही. 

पक्षाकडून चाळीसगाव मतदारसंघात उन्मेष पाटील यांना, तर पाचोऱ्यातून वैशाली सूर्यवंशी यांना ए.बी. फॉर्म देण्यात आला आहे. इतर जागांबाबतदेखील बुधवारी सायंकाळपर्यंत अधिकृत घोषणा होईल. काही जागांवर पेच सुरूच आहे. - विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख, उद्धवसेना 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४jalgaon-city-acजळगाव शहरJalgaonजळगावpachora-acपाचोराchalisgaon-acचाळीसगावUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना