शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

एकाच मतदारसंघातून सलग ५ वेळा निवडणूक लढविणाऱ्या एकमेव महिला, दोनदा यश, तीनदा अपयश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 12:34 IST

Maharashtra Assembly Election 2024 And Congress Parutai Wagh : जुन्या काळातील काँग्रेसच्या मातब्बर नेत्या पारूताई वाघ यांच्या नावावर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकींच्या दृष्टीने एक भला मोठा विक्रम आहे.

बी.एस. चौधरी

एरंडोल : जुन्या काळातील काँग्रेसच्या मातब्बर नेत्या पारूताई वाघ यांच्या नावावर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकींच्या दृष्टीने एक भला मोठा विक्रम आहे. एकाच मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडणूक लढलेल्या त्या खान्देशातील एकमेव महिला उमेदवार आहेत. बहुतेक राज्यातही त्यांच्या या विक्रमाची बरोबरी करणारे कुणी नसावे. विशेष म्हणजे या पाचही निवडणुका त्या काँग्रेस पक्षाकडून लढल्या. 

१९७८,१९८०,१९८५,१९९०,१९९५ अशा ५ वेळा पारूताई वाघ यांना काँग्रेस पक्षातर्फे विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यापैकी दोन वेळा मतदारांनी त्यांना विधानसभेत पाठवले. तर तीन वेळा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. वाघ यांना वेळोवेळी त्यांच्या राजकीय विरोधकांनी कडवा विरोध करून देखील लढाऊ वृत्तीमुळे एकदा नव्हे तर दोनदा त्यांना एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. 

पारूताई वाघ यांनी १९८० व १९८५ अशा सलग दोन विधानसभा निवडणुका त्यांनी जिंकल्या आहेत. एरंडोल मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या अजुनही त्या एकमेव महिला उमेदवार आहेत. त्यांचा अपवाद वगळता आतापर्यंत एरंडोल मतदारसंघावर पुरूष उमेदवारांचे वर्चस्व राहिले आहे. 

पारूताईंनी १९७८ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत अर्ज भरला. पण या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांनी झालेल्या निवडणुकीत त्यांनी विजयश्री खेचून आणली. सन १९८० च्या विधानसभा निवडणुकीत वाघ यांना २४ हजार १११ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी  जनता पक्षाचे उमेदवार विजय धनाजी पाटील यांना १७ हजार ९५० मते मिळाली. ६ हजार १६१ मतांनी वाघ विजय मिळवला. यानंतर सन १९८५ च्या विधानसभा निवडणूकीत वाघ यांना २७ हजार ८०४ मते मिळवून विजय मिळवला तर त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार ॲड.एन. बी. पाटील यांना २२ हजार ८४६ मते मिळाली. यावेळी वाघ यांना ४ हजार ९५८ मतांची आघाडी मिळाली. 

सलग पाचवेळा एकाच मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या त्या विशेष महिला उमेदवार ठरल्या आहेत. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीसुध्दा सलग पाच वेळा विधानसभेची निवडणूक लढली पण पारूताईंप्रमाणे त्यांचा मतदारसंघ एकच नव्हता तर एकदा जळगावमधून आणि नंतर चार वेळा त्यांनी त्यावेळच्या एदलाबाद (मुक्ताईनगर) मतदारसंघातून निवडणूक लढली होती. 

काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास दाखविला. त्यामुळे सलग पाचवेळा निवडणूक लढवता आली.- पारुताई वाघ

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४erandol-acएरंडोलJalgaonजळगावcongressकाँग्रेसPoliticsराजकारण