एम राजकुमार जळगावचे नवे पोलीस अधिक्षक

By सुनील पाटील | Updated: October 20, 2022 22:46 IST2022-10-20T22:45:54+5:302022-10-20T22:46:50+5:30

अधिक्षक पदासाठी एम. राजकुमार यांची नियुक्ती होणार असल्याचे वृत्त 'लोकमत'ने दिले होते

M Rajkumar is the new Superintendent of Police of Jalgaon | एम राजकुमार जळगावचे नवे पोलीस अधिक्षक

एम राजकुमार जळगावचे नवे पोलीस अधिक्षक

लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी एम. राजकुमार यांची नियुक्ती झाली आहे. गुरुवारी सायंकाळी पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी झाले आहेत. एम.राजकुमार यांच्या नियुक्तीच्या आदेशाने 'लोकमत'च्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

एम. राजकुमार सध्या नागपूर  लोहमार्ग येथे पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी यवतमाळ येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कामकाज केलेले आहे. यवतमाळला ते सर्वधिक काळ (सुमारे चार वर्षे) SP होते. राज्यात शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर काही दिवसातच जळगावच्या पोलीस अधीक्षक पदासाठी एम. राजकुमार यांची नियुक्ती होणार असल्याचे वृत्त 'लोकमत'ने दिले होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. मुंढे यांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता.

Web Title: M Rajkumar is the new Superintendent of Police of Jalgaon