जळगाव जिल्ह्यातील तामसवाडी येथे वानराच्या अंत्यविधीला लोटला जनसमुदाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 11:32 IST2017-12-07T11:29:18+5:302017-12-07T11:32:21+5:30

विद्युत तारेला स्पर्श झाल्याने झाला होता वानराचा मृत्यू

Lot's massacre at monkey's funeral at Tamaswadi in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यातील तामसवाडी येथे वानराच्या अंत्यविधीला लोटला जनसमुदाय

जळगाव जिल्ह्यातील तामसवाडी येथे वानराच्या अंत्यविधीला लोटला जनसमुदाय

ठळक मुद्देवाजत-गाजत काढली वानराची गावातून काढली अंत्ययात्रा .झाडावर उड्या मारत असताना तोल जावून वीज तारांना झाला स्पर्शवानराचा दशक्रिया विधी करण्याचे ग्रामस्थांनी केले नियोजन

आॅनलाईन लोकमत
पारोळा,जि.जळगाव,दि.७ : तालुक्यातील तामसवाडी येथे वानराला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने त्यात त्या वानराचा मृत्यू झाल्याने ६ रोजी वानराची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. या वेळी जनसमुदाय लोटला होता. विशेषत: महिलाची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.
तामसवाडी येथील बंडू पवार यांच्या घरामागे व इंदर जैन यांच्या शेतातील झाडावर अनेक वानरं झाडावर उड्या मारताना एका वानराचा तोल जावून मेन लाईनवरील वीज तारांचा स्पर्श झाल्याने त्यात वानराचा मृत्यू झाला होता. यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत अंत्ययात्रा काढली. आग्या म्हणून बंडू पवार, तर चार खांदेकरी म्हणून संजय चौधरी, विकास बेलदार, दौलत पवार, सुनील पाटील होते. सोबत सजीद पिंजारी यांचे बॅण्ड पथक होते. या वानराचा दशक्रिया विधी १५ रोजी होईल, संजय पवार यांनी सांगितले.

Web Title: Lot's massacre at monkey's funeral at Tamaswadi in Jalgaon district