आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २६ - मनुष्य जीवन मिळाल्यानंतर व्यक्ती कसे कर्म करतो, यावर मोक्ष प्राप्ती अवलंबून असून जो भगवंताचा शिष्य नाही मात्र त्याने चांगले कर्म केले तर त्याला मोक्ष प्राप्ती होते, असे विचार महासतीजी मुदीतप्रभाजी म.सा. यांनी व्यक्त केले.भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवास २५ रोजी सकाळी सहपरिवार सामूहिक सामायिकने सुरुवात झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. गणपतीनगरातील रतनलाल बाफना स्वाध्याय भवनात सहपरिवार सामूहिक सामायिकचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. महासतीजी इंदूबालाजी म.सा., महासतीजी मुदीतप्रभाजी म.सा. आदी ठाणा १० यांच्या पावन सान्निध्यात झालेल्या समायिकमध्ये ८५०हून अधिक समाजबांधव सहभागी झाले होते.या वेळी भगवान महावीर यांच्या जीवन कार्याविषयी तसेच त्यांच्या भक्ती विषयी मार्गदर्शन करताना महासतीजी मुदीतप्रभाजी म.सा. यांनी भगवंतांविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.जो भगवंतांचा शिष्य आहे मात्र त्याचे कर्म चांगले नाही त्याला मोक्ष प्राप्ती शक्य नाही मात्र जो भगवंतांचा शिष्य नसूनही त्याचे कर्म चांगले असले तरी त्यास मोक्ष प्राप्ती होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. आपण भगवान महावीरांविषयी ऐकतो, मात्र त्यांचे ऐकत नाही, असे सांगून जीवनात भगवंताचे विचार अंमलात आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. भगवंतांची वाणी २६०० वर्षांनंतरही प्रासंगिक असून त्यांचे विचार अंगीकारा, असेही त्यांनी सांगितले.कंवरलाल संघवी यांनी गेल्या १८ वर्षांपासून दर रविवारी होणाऱ्या सामायिकबद्दल माहिती देत यात समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. या वेळी संघपती दलुभाऊ जैन, शाकाहार सदाचारचे प्रणेते रतनलाल बाफना, श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे प्रमुख दिलीप गांधी, प्रवीण पगारिया, रिकेश गांधी, प्रितेश चोरडिया, प्रवीण छाजेड, आनंद चांदीवाल, संजय रेदासनी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन कस्तुरचंद बाफना यांनी केले.२६ रोजी दुपारी ४.३० वाजता सद्भावना दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. धर्मनाथ जैन मंदिर ते खान्देश सेंट्रल मॉल या दरम्यान काढण्यात येणाºया या रॅलीद्वारे भगवंतांच्या जीवनाचा प्रचार व प्रसार करण्यासह बेटी बटाओ, रक्तदान, देहदान असे सामाजिक संदेशही दिले जाणार आहे. या सोबतच सहभागी दुचाकीस्वारांसाठी धार्मिक वेशभुषा स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धादेखील होणार आहे.
जळगाव येथे सामूहिक सामायिकने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 13:29 IST
मनुष्याच्या कर्मानुसार मोक्षप्राप्ती - मुदीतप्रभाजी म.सा.
जळगाव येथे सामूहिक सामायिकने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवास प्रारंभ
ठळक मुद्दे८५०हून अधिक समाजबांधव सहभागीभगवंतांची वाणी २६०० वर्षांनंतरही प्रासंगिक