अमळनेर : वाचकप्रियतेची पसंती लाभलेल्या आणि वाचकांशी घट्ट नाते जुळलेल्या ‘लोकमत’च्या अमळनेर कार्यालयाचा १४ वा वर्धापन दिन शनिवार, ११ सप्टेंबर रोजी साजरा होत आहे. या निमित्ताने आयएमए लायन्स हॉल, जी.एस. हायस्कूल येथे सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेदरम्यान विशेष पुरवणीचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
‘लोकमत’ने जिल्ह्यातील प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या यांना नेहमीच वाचा फोडली आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात देखील ‘लोकमत’ची भूमिका दिशादर्शक राहिली आहे. सतत सर्वसामान्यांशी एकरूप होऊन नेहमीच नावीन्याचा ध्यास घेत आपली वाटचाल सुरू ठेवली आहे.
वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या ‘कोरोनानंतरचा अनेर बोरी परिसर’ या विशेष पुरवणीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. सर्व कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळून होणार असल्याचे ‘लोकमत’चे कार्यकारीे संपादक रवी टाले व सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी सांगितले.