‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ चे आज जळगावात वितरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 11:37 IST2019-02-23T11:36:08+5:302019-02-23T11:37:46+5:30

प्रचंड उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्डस’ चे वितरण शनिवारी (२३ फेब्रुवारी) जळगावच्या रिंगरोडवरील यशोदया हॉलमध्ये सकाळी ११ वाजता होत आहे. 

Lokmat Sarpanch Awards in jalgaon | ‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ चे आज जळगावात वितरण 

‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ चे आज जळगावात वितरण 

ठळक मुद्दे‘लोकमत सरपंच अवॉर्डस’ चे वितरण शनिवारी जळगावच्या रिंगरोडवरील यशोदया हॉलमध्ये होत आहे. गावाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या व त्या स्वप्नांना मूर्तरुप देण्यासाठी झटणाऱ्या मेहनती व कर्तबगार व्यक्तींना सन्मानीत करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी प्रचंड चुरस आणि उत्सुकता निर्माण झाली आहे.

जळगाव - प्रचंड उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्डस’ चे वितरण शनिवारी (२३ फेब्रुवारी) जळगावच्या रिंगरोडवरील यशोदया हॉलमध्ये सकाळी ११ वाजता होत आहे. गावाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या व त्या स्वप्नांना मूर्तरुप देण्यासाठी झटणाऱ्या मेहनती व कर्तबगार व्यक्तींना सन्मानीत करण्यात येणार आहे. 

यावेळी माजी मंत्री व जिल्ह्याचे ज्येष्ठ सुरेशदादा जैन, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार डॉ. सतीश पाटील, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. बी.एन.पाटील तसेच महाराष्ट्र बीकेटी अ‍ॅग्री सेलचे जुबेर शेख, बीकेटी  डिस्ट्रीब्युटर राहूल धूत हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुरस्कारासाठी प्रचंड चुरस आणि उत्सुकता निर्माण झाली आहे.

Web Title: Lokmat Sarpanch Awards in jalgaon