शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Lok Sabha Election 2019 : बारामतीची जागा पाडली तर पुस्तक लिहावे लागेल - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 13:02 IST

मतदान कमी झाल्यास भाजपाला धोक्याची घंटा

भुसावळ, जि. जळगाव : भाजपा -शिवसेना महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी वातावरण चांगले आहे. मात्र कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या दिवशी मतदारांना बाहेर काढून मतदानाची टक्केवारी वाढवून घ्यावी, असे आवाहन महसूल व कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. मतदानाची टक्केवारी कमी झाली तर भाजपाला फटका बसणार असून ती धोक्याची घंटा ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचार कार्यालयामध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. प्रसंगी आमदार संजय सावकारे , नगराध्यक्ष रमण भोळे, आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, नगरसेवक मनोज बियाणी, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी नगरसेवक निर्मल कोठारी, प्रमोद सावकारे, शिवसेनेचे नगरसेवक मुकेश गुंजाळ , दीपक धांडे, हेमंत खंबायत यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझ्यावर पश्चिम महाराष्ट्रातील दहा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे मी त्या मतदारसंघात लक्ष घालावे, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मला सांगितले. मात्र जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे मी आलो असल्याचे त्यांनी सांगितले.यावल येथेही बैठकयावल येथे नेवे मंगल कार्यालयात तसेच भडगाव येथेही पालकमंत्री पाटील यांनी बैठक घेतली.बारामतीसारखा प्रचार कराजळगाव येथील सभेत पालकमंत्री म्हणाले की, सध्या आपण बारामतीवर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. तिथे जोमाने प्रचार सुरू आहे, बारामतीची जागा जर आपण पाडली तर आपण काय काय केले यासंदर्भात पुस्तक लिहावे लागेल, असे सांगत कार्यकर्त्यांनी तसा प्रचार प्रसार जळगावातही करावा, असे आवाहन केले़ पाटील यांनी भडगाव येथेही बैठक घेतली. माध्यमांच्या सर्व्हेंनुसार आपणच निवडून येऊ म्हणून झोपून राहू नका़ मतदानाची टक्केवारी कमी झाली तर भाजपासाठी ती धोक्याची घंटा ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalgaonजळगाव