शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेचा खून करणाऱ्यास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 20:49 IST

न्यायालय : लॉकडाऊनमधील पहिलाच निकाल

जळगाव : आठ वर्षीय बालिकेचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार व खून केल्याच्या आरोपावरुन समाधान लोटन बडगुजर (३०, रा.पिंपळगाव, ता.एरंडोल) याला न्यायालयाने मंगळवारी जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. लॉकडाऊनमधील हा पहिलाच निकाल असून प्रत्यक्षदर्शी कोणताही पुरावा नसताना परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर ही शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा सत्र न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांनी हा निकाल दिला.या घटनेची माहिती अशी की, विधवा महिला एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्याला होती. तिला एक मुलगा व एक मुलगी असे अपत्य आहेत. आरोपी समाधान बडगुजर हा महिलेच्या भावाचा मित्र असल्याने तो घरी येत असायचा. १४ मे २०१६ महिला व तिचा भाऊ भुसावळ येथे गेले होते. त्यामुळे लहान भावंडेच घरी होते. त्यादिवशी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास समाधान घरी आला. मुलांना लस्सी पाजून आणतो,असे सांगूत तो विधवा महिलेच्या आठ वर्षीय बालिकेलर बाहेर घेऊन गेला. दरम्यान पीडितेची आई बाहेर गावाहून आल्यावर मुलगी दिसली नाही म्हणून शोधाशोध झाली, ती कुठेही आढळून न आल्याने शेवटी एमआयडीसी पोलिसात ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. १८ मे २०१६ रोजी सकाळी पिंप्राळा शिवारात अनिल भिमसिंग पाटील यांच्या शेतातील विहिरीत एका बालिकेचा कुजलेला मृतदेह आढळून आला होता. ही माहिती मिळाल्यानंतर पीडितेच्या आईने घटनास्थळी धाव घेतली होती. बालिकेला तिने ओळखले होते. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केल्यानंतर एमआयडीसी पोलिसात खून, बलात्कार व पोस्कोचे वाढीव कलम लावण्यात आले होते.या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांनी केला होता. त्यात समाधान बडगुजर याला अटक करण्यात आली होती.साक्षीदार फितूर झाल्याने न्यायाधीशांची घेतली साक्षहा खटला आव्हानात्मक होता. प्रत्यक्षदर्शी एकही पुरावा नव्हता. त्याशिवाय रिक्षावाला, लस्सीवाला व शेजारील एक महिला असे तीन साक्षीदार यात फितूर झाले होते. त्यामुळे सहायक जिल्हा सरकारी वकील शिला गोडंबे यांनी या खटल्यात प्रथमवर्ग न्यायाधिश एस.डी.देवरे यांची साक्ष नोंदविली होती. न्या.देवरे यांच्याकडे तिघांच्या साक्षी झाल्या होत्या, त्याशिवाय पीडिताचा कलम १६४ अन्वये जबाब न्या.देवरे यांनी नोंदविला होता. पीडिता, पीडितेची आई, भाऊ, तपासाधिकारी सचिन बागुल, वैद्यकिय अधिकारी यांच्यासह २३ साक्षीदार तपासण्यात आले. बाल साक्षीदाराची साक्ष,प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही व परिस्थितीजन्य पुरावा हे या खटल्याचे वैशिष्टे ठरले.आरोपीने शपथपत्रावर स्वत: लाच तपासलेया खटल्यात आरोपी समाधान बडगुजर याने स्वत:ला बचावासाठी शपथपत्रावर स्वत:ची साक्ष नोंदविली. सीआरपीसी ३१३ अन्वये त्याने लेखी निवेदन न्यायालयात सादर केले, काही फोटो व शपथपत्र सादर केले. त्यावर अ‍ॅड.शिला गोडंबे यांनी त्याची उलटतपासणी घेतली. तांत्रिक मुद्दे व अभ्यासपूर्ण मुद्दे न्यायालयात प्रभावीपणे मांडल्याने न्या. पी.वाय.लाडेकर यांनी आरोपीला दोषी ठरविले. ३०२ अन्वये जन्मठेप, २० हजार रुपये दंड, कलम ३६३ नुसार ५वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने साधा कारावास. दंडाची रक्कम पीडितेच्या आईला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.हा खटला खूप आव्हानात्मक होता. प्रमुख ३ साक्षीदारच फितूर झाल्याने आणखी आव्हान वाढले होते. परिस्थितीजन्य पुरावा, बाल साक्षीदाराची व प्रथम वर्ग न्यायादंडाधिकाऱ्यांची साक्ष तसेच १६४ चा जबाब यात महत्वपूर्ण ठरला. यात आरोपीने स्वत:च्या बचावासाठी शपथपत्रावर साक्ष नोंदविली होती. लॉकडाऊन काळातील पहिलाच निकाल आहे. या निकालामुळे पीडितेला न्याय देऊ शकलो याचे समाधान आहे.-शिला गोडंबे, सहायक जिल्हा सरकारी वकील

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव