जामीन दिल्याच्या बदल्यात जळगावात हवालदाराने मागितली लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 23:19 IST2018-11-12T23:13:42+5:302018-11-12T23:19:14+5:30

वॉरंटमध्ये जामिनावर सोडल्याच्या बदल्यात पाच हजाराची मागणी करणाºया एमआयडीसी पोलीस स्टेशनचा हवालदार दयाराम देवराम महाजन (वय ४७, रा.पोलीस हौसिंग सोसायटी, शाहू नगर, जळगाव) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री ९.३० वाजता जिल्हा रुग्णालयातून अटक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनलाच महाजन याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

In lieu of bail, the bribe demanded bribe money in Jalgaon | जामीन दिल्याच्या बदल्यात जळगावात हवालदाराने मागितली लाच

जामीन दिल्याच्या बदल्यात जळगावात हवालदाराने मागितली लाच

ठळक मुद्दे जिल्हा रुग्णालयात पोलिसाला अटक एसीबीची कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशनचा कर्मचारी

जळगाव : वॉरंटमध्ये जामिनावर सोडल्याच्या बदल्यात पाच हजाराची मागणी करणा-या एमआयडीसी पोलीस स्टेशनचा हवालदार दयाराम देवराम महाजन (वय ४७, रा.पोलीस हौसिंग सोसायटी, शाहू नगर, जळगाव) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री ९.३० वाजता जिल्हा रुग्णालयातून अटक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनलाच महाजन याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे वडील व काका यांच्याविरुध्द जुन्या गुन्ह्याचे वॉरंट होते. या वॉरंटमध्ये महाजन यांनी दोघांना जामीन दिला होता. त्यामुळे महाजन यांनी तक्रारदाराकडे १७ आॅक्टोबर रोजी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत महाजन यांनी लाच मागितल्याचे सिध्द झाले. 
जिल्हा रुग्णालयात रचला सापळा
महाजन यांची सोमवारी जिल्हा रुग्णालयात रात्रपाळीची ड्युटी होती. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक निलेश लोधी व सहका-यांनी घरापासूनच महाजन यांच्यावर नजर ठेवली होती. जिल्हा रुग्णालयाच्या चौकीत येताच पथकाने महाजन यांना ताब्यात घेतले. तेथून महाजन यांना एमआयडीसी पोलीस स्टेशनला लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, लाचेची मागणी करणाºयांविरुध्द तक्रार करण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांनी केले आहे.

Web Title: In lieu of bail, the bribe demanded bribe money in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.