शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशात सव्वा लाख विद्यार्थी घेताहेत स्वावलंबनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 15:53 IST

'तुम्हाला एका वर्षाची बिदागी हवी असेल तर धान्य पेरा, तुम्हाला १०० वर्षांची बिदागी हवी असेल तर माणसे पेरा आणि तुम्हाला हजारो वर्षाची बिदागी हवी असेल तर विचार पेरा,' कर्मवीर भाऊराव पाटील या शिक्षण महषीर्चे हे विचार. स्वावलंबी शिक्षणाचा पाया रोवणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बहुजन समाजासाठी त्यांनी शिक्षणाची द्वारे खुली केली. कमवा आणि शिका योजनेतून तळागाळातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात येत आहे. खान्देशातील तिन्ही जिल्ह्यातील सव्वा लाख विद्यार्थी स्वावलंबनाचे धडे घेताहेत. त्याविषयी ‘लोकमत’च्या ‘मंथन’ पुरवणीत लिहिताहेत जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाचे संचालक संचालक प्रा.डॉ.सत्यजित साळवे....

पुस्तक एके पुस्तक असे शिक्षण भाऊरावांना अभिप्रेत नव्हते. समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी ही मूल्ये शिक्षणातून हरपली पाहिजेत. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे रयत शिक्षण संस्थेचे घोषवाक्य आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या पायावर उभे रहावे आणि शिक्षण घ्यावे, असे त्यांना वाटे. म्हणून त्यांनी कमवा व शिका योजना सुरू केली. शिक्षण हे माणसाच्या विकासाचे मूळ आहे. शिक्षणाने माणूस बहुश्रुत व विवेकी बनतो.आज खेड्यापाड्यातील बहुसंख्य मुले कमवा आणि शिका या योजनेच्या आधाराने शिकली आणि शिकत आहेत. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये ही योजना राबविली जाते. ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुलांना उच्च शिक्षणात ही योजना संजिवनी ठरत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने परिसरातीलच छोटी मोठी कामे केली पाहिजेत. त्या कामाचा मोबदला त्याला दिला जातो. एकविसाव्या शतकात ह्या योजनेची कामे स्मार्ट बनली आहेत. गं्रथालय, प्रयोगशाळा, कार्यालय वाचनकक्ष याठिकाणी संगणकाच्या साह्याने कामे करणे यासाठी योजनेची मदत घेतली जाते.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ही योजना सन १९९३-९४ पासून राबविली जात आहे. आज या योजनेची अडीच कोटी रुपए एवढी तरतूद केली आहे़. ग्रामीण भागातील अथवा आदिवासी क्षेत्रातील कोणत्याही विद्यार्थ्यांला पैशांअभावी शिक्षण घेता येऊ नये, ही बाब स्वस्थ समाजासाठी लाभदायी नाही. फस्ट लरनर असणाऱ्या अनेक पिढ्या आजही उच्च शिक्षणात गती घेताना आर्थिक ओज्याने कोलमडून पडताना दिसताहेत. त्यांच्यासाठी अर्थसाह्याची योजना त्यांच्या शिक्षणात बळ भरण्याचे काम करीत असते. आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू हे ग्रामीण भागातील मुलांचे खºया अथार्ने प्रतिनिधित्व आहे. आपल्या विद्यापीठातील कमवा आणि शिका योजनेबद्दल सांगायचे झाल्यास एक लाख ३० हजार एवढे विद्यार्थी आपल्या विद्यापीठात दरवर्षी नियमित प्रवेश घेतात. त्यापैकी मुलाखतीच्या आधारावर अडीच हजार विद्यार्थ्यांची या योजनेत निवड होते. उरलेल्यांना आर्थिक दुर्बल घटकांना अर्थसहाय योजनेत मदत केली जाते.महाविद्यालय आणि परिसरात विद्यार्थ्यांने दिवसाला किमान तीन तास काम करावे, असे अभिप्रेत आहे. तासाला ४० रुपयेप्रमाणे १२० रुपए त्याला दिवसाला मिळतात. महिन्याला त्याला तीन ते साडेतीन हजार रुपए या योजनेत काम केल्याने मिळू शकतात. म्हणजेच विद्यार्थ्यांने जास्तीत जास्त वेळ महाविद्यालयात असावे. अभ्यास व अभ्यासेतर कार्यक्रमात भाग घ्यावा आणि सक्रिय पद्धतीने उच्च शिक्षणाच्या प्रवाहाचा आनंद घ्यावा. बाहेर कुठेही अर्ध वेळ काम करण्याची आवश्यकता नाही. विविध शिष्यवृत्या आणि अर्थ-सहाय योजनेतून त्याचा उच्च शिक्षणाचा प्रवास सुखकर होतो.संघर्षात यशाचे मूळ दडलेले असते. ज्याच्या वाट्याला संघर्ष नाही त्याला जीवन सपक वाटते. विद्यार्थी दशेपासून अशा योजनेत काम केल्यामुळे श्रमप्रतिष्ठा, सामाजिक भान, व्यवहार, चातुर्य आणि संभाषण कला ही मूल्ये व्यक्तिमत्वाला आकार देतात. आज या योजनेमुळे शिकलेली आणि मोठी झालेली मुले भेटली की, डोळे आपोआप पाणावतात. तीही प्रचंड भावूक होऊन योजनेच्या मदतीविषयी भरभरून बोलतात. कर्मवीर भाऊराव पाटलांचे आज स्मरण करताना हजारो विद्यार्थ्यांच्या तोंडून भाऊरावाबद्दलचे कृतज्ञतेचे शब्द बाहेर पडतात. हीच तर या समाजपुरूषाला खरी आदरांजली आहे़.-प्रा.डॉ.सत्यजित साळवे, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव