आदर्श आचारसंहितेच्या बैठकीकडे जळगावात राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 21:25 IST2018-06-29T21:22:49+5:302018-06-29T21:25:40+5:30
मनपा निवडणुकीसाठी लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेबाबत राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांना व इच्छुक उमेदवारांना माहिती मिळावी यासाठी मनपा आयुक्तांनी शुक्रवारी दुपारी बोलाविलेल्या बैठकीकडे प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांनी पाठ फिरविली.

आदर्श आचारसंहितेच्या बैठकीकडे जळगावात राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची पाठ
जळगाव - मनपा निवडणुकीसाठी लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेबाबत राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांना व इच्छुक उमेदवारांना माहिती मिळावी यासाठी मनपा आयुक्तांनी शुक्रवारी दुपारी बोलाविलेल्या बैठकीकडे प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांनी पाठ फिरविली.
आचारसंहितेबाबतची माहिती जाणून घेण्याबाबत राजकीय पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांमध्ये अनास्था दिसून आली. या बैठकीस माजी महापौर रमेशदादा जैन हे सुरुवातीपासून उपस्थित होते. तर बैठक संपण्याच्याकाही मिनीटांपूर्वी भाजपाचे गटनेते सुनील माळी, नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी हजेरी लावली. यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही पक्षाचा प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित नव्हता. मनपाच्यादुसºया मजल्यावरील सभागृहात झालेल्या बैठकीला मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे, उपायुक्त चंद्रकांत खोसे, लक्ष्मीकांत कहार, पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे, आस्थापना अधीक्षक सुभाष मराठे हे उपस्थित होते.
निवडणूक खर्चासाठी उघडावे लागेल स्वतंत्र खाते
मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी बॅँकेत स्वतंत्र खाते उघडावे लागणार असून, त्यामध्ये निवडणूक आयोगाने खर्च करण्यासाठी निश्चित केलेली रक्कम किंवा त्यापेक्षा कमी रक्कम भरावी लागणार आहे. तसेच उमेदवारांनी निवडणूक प्रचार किंवा इतर कामांसाठी खर्च केलेल्या रक्कमेची माहिती दररोज निवडणूक आयोगाकडे द्यावी लागणार असल्याची माहिती मनपा आयुक्त डांगे यांनी राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांना शुक्रवारी मनपात झालेल्या बैठकीत दिल्या.