शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात लिंबू राक्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 21:41 IST

प्राणघातक हल्ला प्रकरणात राकेश चंद्रकांत साळुंखे (कोळी) उर्फ लिंबू राक्या (२३रा. कांचननगर) याला जिल्हा पेठ पोलिसांनी अटक केली. सोमवारी न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

ठळक मुद्दे पोलीस कोठडी   सरकारी पंचाचा खेळ

जळगाव : प्राणघातक हल्ला प्रकरणात राकेश चंद्रकांत साळुंखे (कोळी) उर्फ लिंबू राक्या (२३रा. कांचननगर) याला जिल्हा पेठ पोलिसांनी अटक केली. सोमवारी न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.१६ रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास  गणेश सोनार हा त्याचे मित्र जगदीश सुकलाल भोई रा. कोळीपेठ व विष्णु गोविंद प्रजापती यांच्यासह गांधी उद्यानाकडून पांडे चौकाकडे पायी जात असताना रस्त्यात राकेश कोळी उर्फ लिंबू राक्या गाडीवर थांबलेला होता. राक्याने जात असलेल्या गणेशला उद्देशून तु दादा झाला आहे का? असे म्हणत कानशिलात लगावली तसेच तुला संपवून टाकेन असे म्हणत त्याच्यावर चाकून वार केला. गणेशला सोडविण्यासाठी विष्णू मध्ये पडला असता त्याच्यावरही लिंबू राक्याने वार केले. यानंतर भितीने विष्णु व जगदीश पळून गेले. याप्रकरणी गणेश सोनार यांच्या फिर्यानीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात लिंबू राक्या विरोधात प्राणघातक हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, या प्रकरणात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.सरकार पंचाचा खेळाचा आरोपीला फटका लिंबू राक्याला पोलिसांनी ९ रोजी रात्री ११.४५ वाजता अटक केली. दरम्यान, गुन्ह्याचे स्वरुप पाहता यात मेमोरंडम पंचनामा हा सरकारी पंचासमक्ष करणे आवश्यक आहे. १० रोजी रविवार असल्याने पंच मिळाले नाही, सोमवारी पंच मिळणेबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग यांना पत्र देण्यात आले.मात्र त्यांनी पत्र न घेता पंच देण्यास नकार दिला, भुमीअभिलेख कार्यालय, उपअधीक्षक यांना पत्र देण्यात आले. त्यांनी सोमवार दुपारी उशीरा एक पंच दिल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली. हत्यार जप्त करुन पंचनामा करणेकामी पुरेसा वेळ मिळाला नाही, असेही न्यायालयाला सांगितले. पंचाअभावी आरोपीला एक दिवस उशिराने न्यायालयात हजर करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव