शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

सभापतीपदाची आरक्षण सोडत : जळगाव जिल्ह्यात तीन पं़स.खुल्या, आठवर महिला राज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:56 AM

पाचोऱ्यातील तिढा थोडक्यात सुटला

जळगाव : जिल्हाभरातील १५ पंचायत समिती सभापतीपदासाठीची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी सकाळी ११:३० वाजता शांततेत काढण्यात आली़ यात आठ पंचायत समित्या महिला राखीव झालेल्या असून रावेर, धरणगाव, मुक्ताईनगर पंचायत समित्यांमध्ये कुठलेही आरक्षण नसून तेथील पद सर्वसाधारण निश्चित झालेल्या आहेत़पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक मार्च २०१७ मध्ये झालेली होती़ सभापतीपदाच्या आरक्षणाची मुदत १३ सप्टेंबर २०१९ रोजी संपणार होती मात्र, विधानसभा निवडणुकांमध्ये हा कालावधी २६ आॅगस्टला चार महिन्यांसाठी वाढविण्यात आलेला होता़ त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ़ नंदकुमार बेडसे, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी आरक्षण सोडत जाहीर केली़ दरम्यान, अकरा वाजेची वेळ असताना साडे अकराच्या सुमारास अर्धा तास उशीराने ही प्रक्रिया सुरू झाली़ देवांशी वानखेडे या विद्यार्थिनीच्या हातून ही आरक्षण सोडत काढण्यात आले़पाच विविध प्रवर्गांमध्ये हे आरक्षण काढण्यात आले़ यात शासनाने निश्चत करून दिलेल्या आरक्षणानुसार अनूसूचित जाती १, अनुसूचित जमाती १, अनुसूचित जमाती महिला २, नामप्र (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) २ व नागरिकांचा मागास प्रवर्ग २ या पद्धतीने आरक्षण काढण्यात आले़ उर्वरित पंचायत समितींची पदे ही सर्वसाधारण आहेत़पाचोरा येथे पेच अन् पुरूष उमेदवाराला संधीपाचोरा येथील आरक्षण अनुसूचित जमाती महिला राखीव निघाले आहे़ मात्र, पाचोºयात या प्रवर्गातील महिला उमेदवार नसल्याने पेच निर्माण झाला होता़ लागलीच येथील सर्व सदस्यांनी जिल्हाधिकारी डॉ़ बेडसे यांच्याकडे धाव घेत हा पेच मांडला़यावर महिला उमेदवार नसल्यास त्या प्रवर्गातील पुरूष उमेदवार ग्राह्य धरले जातील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर हा पेच सुटला़राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ रवींद्र पाटील, जि़ प़ सदस्य नानाभाऊ महाजन यांची यावेळी उपस्थिती होती़भुसावळच्या सदस्यांची धावभुसावळ पंचायत समितीतील पद आजपर्यंत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झालेले नाही, त्यामुळे या प्रवर्गातील आरक्षण निघणे अपेक्षित होते, अशी शंका सदस्यांनी मांडली यावर जिल्हाभरातील केवळ एकच पद अनुसूचित जातीसाठी राखीव काढायचे होते़ लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार बोदवडसाठी हे पद आरक्षित झाल्याचे सांगण्यात आले़

टॅग्स :Jalgaonजळगाव