शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या तपासासाठी एलसीबी पथक तळ ठोकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:13 IST

अमळनेर : शहरात टाकरखेडा धरणगाव रस्त्यावर वनजमिनीत जळालेल्या अवस्थेत एक प्रेत आढळून आल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात ...

अमळनेर : शहरात टाकरखेडा धरणगाव रस्त्यावर वनजमिनीत जळालेल्या अवस्थेत एक प्रेत आढळून आल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव गुन्हे शाखा तथा एलसीबी निरीक्षक व त्यांच्या पथकाने गुरुवारी अमळनेरात भेट देऊन घटनास्थळी पाहणी केली. यानंतर हे पथक शहरातच मुक्कामी थांबले आहे.

ही घटना म्हणजे खुनाचाच प्रकार असावा आणि लपविण्याच्या उद्देशानेच त्यास येथे आणून टाकले असावे, असा अंदाज एलसीबीचा आहे. त्याआधी हा व्यक्ती नेमकी कोण व कुठली यास प्राधान्य देण्यात येत असून त्यानंतर खुनाच्या दिशेने पुढील तपास सुरू होणार आहे. मात्र परिस्थितीजन्य पुराव्यानुसार खुनाचा गुन्हा आधीच दाखल झाला असल्याची माहिती निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी दिली.

रात्री उशिरापर्यंत हे पथक अमळनेर पोलीस ठाण्यात होते. अजून काही माहिती हाती लागली किंवा नाही त्याबद्दल अधिक समजू शकले नाही. दरम्यान, धरणगाव टाकरखेडे रस्त्यावर वनजमिनीत एक ३० वर्षीय युवकाचे प्रेत जळालेल्या अवस्थेत असल्याची माहिती पळासदळे येथील गणेश आत्माराम पाटील यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, डीवायएसपी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, एपीआय राकेश परदेशी, पोलीस उपनिरीक्षक राहुल लबडे यांनी घटनास्थळी भेट दिली होती. त्या युवकाची पॅन्ट व अंडरवियर अर्धवट अवस्थेत जळलेली होती. तरुणाचा चेहरा पूर्णपणे जळालेला होता. घटनास्थळी काही लाकडे अर्धवट जळलेल्या अवस्थेत आणि एक रिकामी बाटली पडलेली दिसली. प्रेताची परिस्थिती विचित्र असल्याने डॉ. योगेश वाणी यांनी जागेवर जाऊन शवविच्छेदन केले होते.

दरम्यान, मयताच्या हातावर ओमचे चिन्ह गोंदलेले होते. त्याच्या छातीवर मारहाण झाल्याचे व पायाचे हाड मोडलेले दिसून आले. जवळच रक्त लागलेले लाकूडदेखील पडलेले होते. तसेच रिकाम्या बाटलीला पेट्रोलचा वास येत होता. त्यामुळे त्या युवकाला आधी मारहाण करून नंतर जाळण्यात आले असावे. ही घटना ३० ते ३१ मे दरम्यान घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

प्रेताची नखे, केस, रक्ताचे नमुने डीएनए चाचणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहेत, मयताची व मारेकऱ्यांची माहिती अमळनेर पोलीस स्टेशनला कळवल्यास योग्य बक्षीस दिले जाईल, असे अमळनेर पोलिसांतर्फे कळविण्यात आले आहे.