‘त्या’ घरफोडीचा आरोपी एलसीबीने पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 23:49 IST2021-04-08T23:48:14+5:302021-04-08T23:49:42+5:30
आर. के. कंपनीसमोरील घरात झालेली चोरी एलसीबी पोलिसांनी शोधून मुंबई गल्लीतील आरोपीला अटक केली आहे.

‘त्या’ घरफोडीचा आरोपी एलसीबीने पकडला
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : शहरातील आर. के. कंपनीसमोरील घरात झालेली चोरी एलसीबी पोलिसांनी शोधून मुंबई गल्लीतील आरोपीला अटक केली असून त्यातील काही रक्कम व दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
जितू वॉशिंग सेंटरवरील राहणारी महिला आशा हिला कोरोना झाल्यामुळे तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्याची संधी साधत चोरट्याने तिच्या घरातील दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले याना गोपनीय माहिती मिळाली की, मुंबई गल्लीतील काजल उर्फ शेख रफिक शेख रशीद याने व त्याच्या तीन साथीदारांनी ही घरफोडी केली असून काजल मुंबई गल्लीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी हेडकॉन्स्टेबल विजयसिंग पाटील, सुधाकर आंभोरे, जितेंद्र पाटील, नरेंद्र वारुळे, अश्रफ शेख, प्रवीण मांडोळे, नितीन बाविस्कर, राहुल पाटील, प्रीतम पाटील, दीपक शिंदे, परेश महाजन, इद्रिस पठाण, अशोक पाटील, मुरलीधर बारी, सविता परदेशी, अभिलाषा मनोरे याना पाठवून काजल याला अटक केली.त्याच्या ताब्यातून ३८ हजार ५०० रुपये रोख आणि १४ हजार ४१० रुपयांचे कानातले असा माल जप्त केला आहे. आरोपीला अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू आहे.