गेल्या ४५ दिवसात जिल्ह्यात कोरोनामुळे ४४२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:14 AM2021-04-15T04:14:59+5:302021-04-15T04:14:59+5:30

कोरोनाची पहिली लाट - मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ - एकूण रुग्ण - ६० हजार ८७८ - ...

In the last 45 days, 442 people have died due to corona in the district | गेल्या ४५ दिवसात जिल्ह्यात कोरोनामुळे ४४२ जणांचा मृत्यू

गेल्या ४५ दिवसात जिल्ह्यात कोरोनामुळे ४४२ जणांचा मृत्यू

Next

कोरोनाची पहिली लाट

- मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ - एकूण रुग्ण - ६० हजार ८७८

- दिवस - ३३४

- रुग्ण वाढीची सरासरी - १८२ रुग्ण दर दिवसाला आढळले

- एकूण मृत्यू - १३८५

-मृतांची दर दिवसाला सरासरी - ४.१४

कोरोनाची दुसरी लाट

- १ मार्च ते १३ एप्रिल

- एकूण रुग्ण - ४३ हजार २७४

- दिवस - ४५

- रुग्ण वाढीची सरासरी - ९६१

- एकूण मृत्यू -४४२

- मृतांची सरासरी दर दिवसाला - १०.१८

जळगाव: जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यातच गेल्या दहा दिवसापासून दिवसामागे १ हजारहून अधिक रुग्णांची भर पडत आहे, तर पंधराहून अधिक रुग्णांच्या मृत्यू दर दिवसाला होत आहे. प्रशासनाकडून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्या तरी वाढत्या संख्येवर सध्या तरी कोणतेही नियंत्रण आणण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. विशेष म्हणजे पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत दर दिवसाला आढळणाऱ्या नवीन रुग्णांच्या संख्येसोबत होणाऱ्या मृत्यूची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

जिल्ह्यात २८ मार्च २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर रुग्णवाढीचा जोर हा सातत्याने वाढत जात आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट ही अधिक तीव्र असल्याचे आतापर्यंत आढळून आलेल्या रूग्णवाढीच्या संख्येवरून दिसून येते, तसेच यामध्ये रुग्णाला लागण झाल्यानंतर मृत्यूची शक्यता देखील बळावली आहे. प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठी आपल्या स्तरावर चांगल्या उपाययोजना केलेल्या आहेत. मात्र, नागरिकांकडून दुर्लक्ष होत असल्याने देखील कोरोनाचा फैलाव अधिक वेगाने वाढत आहे.

मार्च महिन्यात सर्वाधिक रुग्णांची झाली नोंद

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळेस २४ मार्च २०२० रोजी केंद्र शासनाकडून संपूर्ण भारतभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव आल्यानंतर जिल्ह्यात मार्च २०२० मध्ये सर्वात कमी म्हणजेच केवळ २ कोरोनाबाधित होते. मात्र वर्षभरानंतर ही संख्या आता लाखांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे मार्च महिन्यात ही संख्या तब्बल २९ हजाराने वाढली आहे तर एप्रिल महिन्यात देखील आतापर्यंत पंधरा हजारहून अधिक नवीन रुग्ण जिल्हाभरात सापडले आहेत.

जिल्हाभरात कोरोना रुग्णांचा वर्षभरात वाढत जाणारा आलेख

मार्च २०२० - ०२

एप्रिल - ३७

मे -. ७४८

जून - ३५२८

जुलै -१११०३

ऑगस्ट - २७५९१

सप्टेंबर- ४८१८०

ऑक्टोबर- ५३३२८

नोव्हेंबर -५४८५६

डिसेंबर -५६३१९

जानेवारी २०२१ - ५७६९९

फेब्रुवारी - ६०८७८

मार्च -८९०११८

एप्रिल १३ पर्यंत - १०४१५२

Web Title: In the last 45 days, 442 people have died due to corona in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.