पारोळा : येथील कजगाव रस्त्यावर असलेल्या डेरेदार वृक्षाला कत्तल करण्याच्या उद्देशाने आग लावण्याचा प्रकार घडला. वेळीच झाडाला लावलेली आग विझविण्यात आल्याने झाडाला संजीवनी मिळाली.मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास शहरापासून एक किलोमीटर अंतरावर वाकड्या पुलाजवळ असलेल्या सर्वात मोठ्या डेरेदार वृक्षाच्या बुंध्याजवळ अज्ञाताने आग लावली. क्षणार्धात झाडाने पेट घेतला. ही बाब काहींच्या लक्षात आली. नगरसेवक धीरज महाजन व भाजपाचे माजी तालुकाप्रमुख रवींद्र पाटील यांनी जवळच असलेल्या पोल्ट्रीफार्मवरून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात न आल्याने अग्निशमन दलाचा बंब बोलविण्यात आला. वासुदेव पाटील, भैया पाटील, राकेश शिंदे, अविनाश भोसले आदींनी आग विझविण्यास मदत केली. झाडांना आग लावणाºयांविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वनप्रेमींकडून होऊ लागली आहे. (वार्ताहर)
डेरेदार वृक्षाला लावली आग
By admin | Updated: March 23, 2017 00:05 IST
पारोळा : नागरिकांच्या सतर्कतेमुळे झाड वाचले
डेरेदार वृक्षाला लावली आग
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}