शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हे कुटुंबीयांचे जळगाव महापालिकेत वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 13:12 IST

ललित कोल्हेही बनले महापौर

जळगाव : मनपा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु झाली आहे. महानगरपालिकेच्या स्थापनेपासून काही कुटुंबातील सदस्यांचे नेहमी वर्चस्व राहिले आहे.नगरपालिकेपासून तर सध्याच्या मनपात कोल्हे कुटुंबातील अनेक सदस्य नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तत्कालीन नगरपालिकेत पंडितराव कोल्हे यांनी नगराध्यक्षपद देखील भूषविले. तसेच अनेक तीन पंचवार्षिकपर्यंत ते नगरसेवक म्हणून निवडून आले.विजय कोल्हे व दिलीप कोल्हे यांचेही राहिले वर्चस्वपंडीतराव कोल्हे यांच्यानंतर त्यांच्या मुलांनी देखील त्यांचा राजकीय वारसा पुढे नेला. विजय कोल्हे हे गेल्या २५ वर्षांपासून महानगरपालिकेत निवडून येत आहे. सध्याच्या महापालिकेत देखील ते नगरसेवक आहेत. मनसेतून भाजपात प्रवेश केल्याने त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. दिलीप कोल्हे हे सुद्धा तीन पंचवार्षिक नगरसेवक राहीले. जुन्या जळगावभागात कोल्हे कुटूंबियांचे वर्चस्व नेहमीच राहिले आहे.पहिल्या महापौरपदाचा मान कोल्हे कुटुंबीयांनाचमनपाची स्थापना २००३ मध्ये झाल्यानंतर शहराच्या प्रथम महापौर होण्याचा मान हा देखील कोल्हे कुटुंबीयांनाच मिळाला. विद्यमान नगरसेविका आशा कोल्हे यांनी पहिल्या महापौरपदाचा मान मिळाला होता. यासह विजय कोल्हे यांच्या पत्नी सिंधुताई कोल्हे यादेखील तत्कालीन नगरपालिकेत नगराध्यक्ष राहिल्या.ललित कोल्हेही बनले महापौरललित कोल्हे यांनी आजोबा व वडील यांचा राजकीय वारसा पुढे सुरु ठेवला आहे. महापौर म्हणूनही त्यांना सुरेशदादा जैन यांनी संधी दिली. दोन दिवसापूर्वीच त्यांनी भाजपात प्रवेश केला असून त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. दिलीप कोल्हे यांचे चिरंजीव परेश कोल्हे हे देखील राष्टÑवादी काँग्रेसमध्ये आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव