कोजागरी पौर्णिमा : दीड लाख लिटर अतिरिक्त दूधाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 12:29 PM2019-10-12T12:29:58+5:302019-10-12T12:30:26+5:30

जिल्हा दूध संघ व दूध डेअरीकडूनही तयारी

Kojagari Purnima: Demand for 1.5 million liters of extra milk | कोजागरी पौर्णिमा : दीड लाख लिटर अतिरिक्त दूधाची मागणी

कोजागरी पौर्णिमा : दीड लाख लिटर अतिरिक्त दूधाची मागणी

googlenewsNext

जळगाव : कोजागरीनिमित्त जिल्ह्यात यंदाही तब्बल दीड लाख लिटर अतिरिक्त दुधाची आवश्यकता भासणार आहे. जिल्हा दूध संघाने त्यासाठी पूर्ण नियोजन केले असून मागणी नुसार दूध पुरविण्याची तयारी केली आहे. या सोबतच खाजगी डेअरीकडूनही वाढीव मागणी करण्यात आली आहे.
दरवर्षी कोजागिरीसाठी त्याच दिवशी सकाळी मागणी सुरू होते. दुपारी ४ वाजेपर्यंत ही मागणी पूर्ण केली जाते. शहरात दररोज ६५ हजार लिटर तर जिल्ह्यात एकूण १ लाख लिटर दुधाचा पुरवठा केला जातो. मात्र कोजागरीच्या दिवशी या मागणीत तब्बत दुप्पट वाढ होते.
ऐनवेळी मागणी नोंदविल्याने अनेकदा पुरेसा पुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळे यंदा दूध संघाने याबाबत नियोजन केले असून ग्राहकांनी किरकोळ विक्रेत्यांकडे आधीच मागणी नोंदवणे सुरु केले आहे.
खाजगी डेअरी चालकांकडून वाढीव मागणी
एरव्ही खाजगी डेअरीवरून दररोज सरासरी एक हजार लिटर दुधाची विक्री होते. मात्र आता कोजागरी पौर्णिमेनिमित्त या डेअरी चालकांनी तीन हजार लिटर दुधाची अतिरिक्त मागणी करण्यात आल्याची माहिती डेअरी चालकांनी दिली.
कोजागरी पौर्णिमेच्या अनुषंगाने अनेक मंडळांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
कोजागरी रविवारीच
शनिवारी मध्यरात्रीनंतर पौर्णिमेला प्रारंभ होणार आहे. मात्र कोजागरी पौर्णिमा रविवार, १३ रोजीच साजरी करावी, अशी माहिती पुरोहितांनी दिली. रविवारी मध्यरात्री २.३८ वाजेपर्यंत पौर्णिमा असल्याने रविवारीच कोजागिरी साजरी करण्यात येणार आहे.
लक्ष्मी-इंद्रदेवतेच्या पूजनासह ज्येष्ठ अपत्याचे औक्षण
कोजागरी पौर्णिमेला रात्री लक्ष्मी तसेच इंद्र देवतेचे पूजन करण्याचा प्रघात आहे. या सोबतच ज्येष्ठ अपत्याचे औक्षणदेखील करण्यात येते. मातीचे दिवे करून व समोर गव्हाची मांडणी करून हे औक्षण केले जाते.

Web Title: Kojagari Purnima: Demand for 1.5 million liters of extra milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव