ममुराबाद परिसरात खरीपाची राखरांगोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 21:59 IST2019-11-06T21:58:37+5:302019-11-06T21:59:05+5:30
ममुराबाद, ता. जळगाव : परिसरात परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन आणि कापूस पिकाची अतिशय वाईट अवस्था ...

ममुराबाद परिसरात खरीपाची राखरांगोळी
ममुराबाद, ता. जळगाव : परिसरात परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन आणि कापूस पिकाची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. पावसात भिजलेल्या कापसासह धान्याला जागेवरच कोंब फुटले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने संबंधित शेतकऱ्यांच्या पदरी केवळ निराशा पडली आहे.
सततच्या पावसामुळे पूर्वहंगामी उन्हाळी कपाशीचे नुकसान झाल्याने दसरा झाल्यानंतर घरात कापूस आल्यानंतर दिवाळी साजरी करणा?्या शेतकऱ्यांसमोर यंदा अंधार पसरला आहे. पावसामुळे जमिनीलगतच्या कैºया तसेच बोंड कुजल्यानंतर वरचा बहार तरी उत्पन्न देईल, अशी आशा शेतकरी बाळगून होते. प्रत्यक्षात सतत पाऊस सुरू राहिल्याने वरील फांद्याना लागलेल्या कापसाच्या बोंडांमधील सरकीलाही कोंब फुटले आहेत.
बियाणे, खते, फवारणी तसेच मशागतीसाठी अतोनात खर्च करूनसुद्धा घरात एक बोंड न आल्याने कापूस उत्पादकांना डोक्याला हात लावावा लागला आहे. अशाच प्रकारे उडीद व मूग ही पिके शेतात सडल्यानंतर सोयाबीन, ज्वारी, बाजरी आणि मका ही पिके तरी वाचतील, असे शेतकºयांना वाटले होते. मात्र, पावसाने शेतकºयांच्या उरल्या सुरल्या आशेवरही पाणी पाडले आहे. तसे पाहिले तर परिपक्व झालेल्या सर्व पिकांची पंधरा दिवसांपूर्वीच काढणी करायला पाहिजे होती. परंतु, पाऊस एकसारखा सुरुच असल्याने शेतक?्यांना नाईलाज झाला असून, डोळ्यादेखत मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या हंगामाची राखरांगोळी होताना पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
काही शेतकºयांनी दसरा झाल्यानंतर पावसाची उघडीप मिळताच ज्वारी तसेच सोयाबीची कापणी करण्याची घाई केली होती. मात्र, त्यांना कापलेले पीक उचलण्याची सवडही पावसाने दिलेली नसून, जमिनीवर पडलेले धान्य जागेवरच उगवले आहे. शासनाने ओल्या दुष्काळाची स्थिती लक्षात घेता नुकसानीचे पंचनामे करण्यात वेळ घालविण्यापेक्षा नुकसानग्रस्तांना सरसकट मदत देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.