पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा हिवरा प्रकल्प ओव्हर फ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 20:02 IST2019-09-16T19:58:14+5:302019-09-16T20:02:09+5:30
खडकदेवळा येथील हिवरा मध्यम प्रकल्पाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आजच्या स्थितीत हा प्रकल्प ओसंडून वहात आहे.

पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा हिवरा प्रकल्प ओव्हर फ्लो
आत्माराम गायकवाड
खडकदेवळा, ता.पाचोरा, जि.जळगाव : येथील हिवरा मध्यम प्रकल्पाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आजच्या स्थितीत हा प्रकल्प ओसंडून वहात आहे.
या प्रकल्पाच्या उगमस्थानी डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. प्रकल्पात १०० टक्के जलसाठा झाला आहे.
हा प्रकल्प भरल्याने परिसरातील पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. परिसरातील अनेक ग्राम पंचायतींचा पाणीपुरवठा हा याच प्रकल्पाच्या जलसाठ्यावर अवलंबून आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण भरल्याने समाधान व्यक्त होत आहे. तसेच हिवरा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
प्रकल्प बनला धोकेदायकही
खडकदेवळा येथील प्रसिद्ध असलेल्या हिवरा मध्यम प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीच्या पाईपांची चोरी झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला भेट देण्यासाठी येणाºया पर्यटकांची गैरसोय झाली आहे. अनेकांना सेल्फी घेण्याचा मोह होतो. या ठिकाणी संरक्षण भिंतीच्या पाईपाची चोरी झाल्याने मोठी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
या प्रकल्पाच्या मातीच्या भरावाजवळील भिंतीच्या जवळपास तीस ते चाळीस फुटाचे मोठे जीवघेणे खड्डे पडले आहेत. ते त्वरित बुडवण्याची मागणी होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे प्रकल्पाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे