अवघ्या आठ महिन्यात राठोड यांनी मिळविली दीडशे प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 21:03 IST2021-03-01T21:03:56+5:302021-03-01T21:03:56+5:30
जळगाव : वर्धमान सी.बी.एस.ई. इंग्लिश मीडियम स्कूलमधील उपक्रमशील शिक्षक बी.एस. राठोड यांनी विविध प्रश्नमंजुषा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून अवघ्या आठ ...

अवघ्या आठ महिन्यात राठोड यांनी मिळविली दीडशे प्रमाणपत्र
जळगाव : वर्धमान सी.बी.एस.ई. इंग्लिश मीडियम स्कूलमधील उपक्रमशील शिक्षक बी.एस. राठोड यांनी विविध प्रश्नमंजुषा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून अवघ्या आठ महिन्यात तब्बल दीडशे प्रमाणपत्र मिळविली. त्याच्या यशाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
जून २०२० पासून आजतागायत ऑनलाइन पद्धतीने झालेल्या विविध विषयावरील स्पर्धेमध्ये तसेच कोविड-१९ काळात जनजागृतीसाठी आयोजित राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध प्रश्नमंजुषा स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला होता. कोरोना काळात विद्यापीठ स्तरावर व्यापक स्वरूपात जनजागृती व्हावी म्हणून विविध प्रकारचे स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात प्रश्नमंजुषा, ऑनलाइन वेबिनार असे अनेक स्पर्धेत त्यातही त्यांचा सहभाग होता. माय जिओच्या सरकारी वेबसाईटवरून ५० पर्यंत प्रमाणपत्र मिळविली असून महाविद्यालय इतर स्वयंसेवी संस्थांकडून विविध प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.