पहूर येथे युवकावर अज्ञातांकडून जिवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 13:08 IST2018-11-13T13:08:02+5:302018-11-13T13:08:32+5:30

पहूर पोलिसात तक्रार

Jivghatna attack by the unidentified youth on the spot | पहूर येथे युवकावर अज्ञातांकडून जिवघेणा हल्ला

पहूर येथे युवकावर अज्ञातांकडून जिवघेणा हल्ला

पहूर. जि. जळगाव : जामनेर तालुक्यातील पहूर पेठ मधील रहिवासी सुरेश प्रल्हाद पाटील (३०) यांच्यावर मंगळवारी पहाटे पाच वाजता शेतात जात असताना अज्ञात पाच ते सहा युवकांनी लाठ्याकाठायांनी मारहाण करून जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी पहूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सुरेश पाटील हे पाटाच्या रस्त्याने मोतीआईधरणा कडे असलेल्या त्याच्या शेतात दूध काढण्यासाठी जात असताना रस्त्यात एका अज्ञात युवकाने आडवून सुरेशच्या डोळ्यात मातीफेकली. त्याचवेळेस अन्य पाच अज्ञात यूवकांनी लाठ्याकाठ्यानी मोठ्या प्रमाणावर मारहाण करून हल्ला चढवला. हल्लेखोरांनी तोंडावर पांढरे रूमाल बांधलेले होते. हल्लेखोर पसार झाल्यानंतर सुरेश भीतिपोटी शेतात लपून बसला होता. त्याठिकाणावरून त्याने त्याचा लहान भाऊ विनोद याला फोन करून माहिती दिली. त्याच्यावर प्राथमिक उपचार ग्रामीण रूग्णालयात करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात रवाना करण्यात आले आहे. विनोद पाटील यांनी हल्लेखोरांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Jivghatna attack by the unidentified youth on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.