मराठा इन्फ्रंटी बटालियनचा जवान मणिपूरच्या हल्ल्यात झाला शहीद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 16:54 IST2021-01-31T16:53:15+5:302021-01-31T16:54:00+5:30
Martryred : ही घटना ३१ रोजी पहाटे दोन वाजता घडली.

मराठा इन्फ्रंटी बटालियनचा जवान मणिपूरच्या हल्ल्यात झाला शहीद
ठळक मुद्देसागर धनगर हे नोव्हेंबर २०१७ मध्ये ५, मराठा इन्फ्रंटी बटालियनमध्ये रुजू झाले होते. सागर यांचे पार्थिव १ रोजी दुपारी २ वाजता इंम्फाळ (मणिपूर) येथून गुवाहाटी (आसाम) येथे आणण्यात येणार आहे.
चाळीसगाव (जि. जळगाव) : तालुक्यातील तांबोळे बुद्रक येथील सुपुत्र सागर रामा धनगर (२७) हे सेनापती (मणिपूर) येथे झालेल्या हल्ल्यात शहीद झाले. ही घटना ३१ रोजी पहाटे दोन वाजता घडली.
आष्टी तालुक्यातील वीर जवान शरद चांदगुडे अनंतात विलीन
सागर धनगर हे नोव्हेंबर २०१७ मध्ये ५, मराठा इन्फ्रंटी बटालियनमध्ये रुजू झाले होते. सागर यांचे पार्थिव १ रोजी दुपारी २ वाजता इंम्फाळ (मणिपूर) येथून गुवाहाटी (आसाम) येथे आणण्यात येणार आहे. तेथून ते मुंबई येथील विमानतळावर सांयकाळी ७.१५ वा. पोहचेल. त्यांनतर ते शक्यतो मंगळवार, २ फेब्रुवारी रोजी त्यांच्या मुळगावी आणण्यात येईल. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.