देशसेवा करताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण, भडगाव येथील जवान लडाख येथे शहीद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 23:52 IST2021-07-10T23:51:34+5:302021-07-10T23:52:11+5:30

Indian Army News: भडगाव येथील टोणगाव भागातील रहिवासी नीलेश रामभाऊ सोनवणे (२९) हे  लेह लडाख येथे कर्तव्यावर असतांना शहिद झाले.

Jawan from Bhadgaon martyred at Ladakh | देशसेवा करताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण, भडगाव येथील जवान लडाख येथे शहीद 

देशसेवा करताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण, भडगाव येथील जवान लडाख येथे शहीद 

जळगाव - भडगाव येथील टोणगाव भागातील रहिवासी नीलेश रामभाऊ सोनवणे (२९) हे  लेह लडाख येथे कर्तव्यावर असतांना शहिद झाले.  याबाबत सैन्य दलाकडून शनिवारी दुपारी त्यांच्या कुटुंबीयांना निरोप देण्यात आला. नीलेश यांच्या निधनाची माहिती मिळताच परिसरातील युवक व ग्रामस्थांनी त्यांच्या घराजवळ एकच गर्दी केली होती. 
नीलेश यांच्या पश्चात आई व पाच भाऊ आहेत. दोन मोठे भाऊ बाळासाहेब सोनवणे व रावसाहेब सोनवणे हे मुंबई पोलीस दलात सेवेत आहेत. तर एक भाऊ गावात पेंटिंग  व्यवसाय करतो.   रविवारी सायंकाळी अथवा सोमवारी सकाळी नीलेश यांचा मृतदेह भडगाव येथे आणला जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Jawan from Bhadgaon martyred at Ladakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.