Jamner challenges the municipality when it comes to clean surveys | स्वच्छ सर्वेक्षणाला सामोरे जाताना जामनेरला पालिकेपुढे आव्हान

स्वच्छ सर्वेक्षणाला सामोरे जाताना जामनेरला पालिकेपुढे आव्हान

ठळक मुद्देजामनेरला मोकाट डुकरांचा सुळसुळाटनागरिकांना सहन करावा लागतोय त्रास

जामनेर, जि.जळगाव : शहरातील विविध भागात मोकाट डुकरांचा सुळसुळाट झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बिस्मिल्ला नगर व मदनी नगरात दोन बालकांना डुकरानी चावा घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पालिकेने डुकरांचा बंदोबस्त करावा, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
भाजी मंडई, मेनरोड वरील दुभाजकावर भाजी विक्रेते बसतात. भाजी घेण्यासाठी येणाऱ्या महिलांना डुकरांचा त्रास वाढला आहे. या भागात होत असलेल्या अस्वच्छतेमुळे व डुकरांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भाजी विक्रेते रस्त्यावरच कचरा फेकतात मात्र पालिकेकडून नियमित स्वच्छता होत नसल्याचे दिसून येते.
मदनी नगर, बशीर नगर, बिस्मिल्ला नगरसह शहरातील सर्वच भागात डुकरांची संख्या वाढल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेकडे वारंवार मागणी करूनदेखील दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यापूर्वी नगरसेवकाने पालिकेकडे डुकरांच्या बंदोबस्ताची मागणी केली होती. मुख्याधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन मोकाट डुकरांचा बंदोबस्त करावा, असे बोलले जात आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात तरी दुर्लक्ष नको
पालिका स्वच्छ सर्वेक्षण २०२० ची तयारी करीत आहे. यासाठी भिंती रंगवून नागरिकांना स्वच्छतेबाबत आवाहन केले जात आहे. मात्र पालिकेच्या मुतारीची नियमित स्वच्छता होत नाही. सार्वजनिक ठिकाणी ठेवलेल्या कचरा कुंड्या हटविण्यात आल्याने ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचले आहे. सार्वजनिक शौचालयांची नियमित सफाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. भाजी मंडईतील मुतारींची नियमीत सफाई होत नसल्याने परिसरात डासांची संख्या वाढली आहे

Web Title: Jamner challenges the municipality when it comes to clean surveys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.