गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात भाजपा शत प्रतिशत; 25 जागांवर विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 11:46 IST2018-04-12T11:46:53+5:302018-04-12T11:46:53+5:30

गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यादेखील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या.

Jamnagar mahanagar palika election 2018 Girish Mahajan wins in prestigious battle BJP get all 25 seats | गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात भाजपा शत प्रतिशत; 25 जागांवर विजयी

गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात भाजपा शत प्रतिशत; 25 जागांवर विजयी

जळगाव: राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला असलेल्या जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत गुरूवारी भाजपाने दणदणीत विजय मिळवला. भाजपाने पालिकेच्या सर्व 24 जागांवर बाजी मारली. तर गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यादेखील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रा. अंजली पवार यांच्यावर 8 हजार 353 मतांनी विजय मिळवला. 

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आघाडीने १४ जागा मिळवित सत्ता मिळविल्यानंतर अडीच वर्षांनी साधना महाजन या आघाडीच्याच काही सदस्यांच्या पाठिंब्याने नगराध्यक्ष झाल्या होत्या. आता या निवडणुकीत गिरीश महाजन यांनी पूर्ण शक्ती लावून आपला हा गड १०० टक्के भाजपच्या ताब्यात मिळविण्यात यश मिळविल्याचे मानले जात आहे. दरम्यान, सर्व जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी जाहीर केले.

Web Title: Jamnagar mahanagar palika election 2018 Girish Mahajan wins in prestigious battle BJP get all 25 seats