जळगाव : केसीई सोसायटी संचलित ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूलची विद्यार्थिनी आकांक्षा म्हेत्रे ही राज्य सायकलिंग स्पर्धेत चॅम्पियन ठरली आहे.३१ जानेवारी रोजी औरंगाबादमध्ये २५वी राष्ट्रीय रोड सायकलिंग चॅम्पियनशिप घेण्यात आली. ही राज्यस्तरीय स्पर्धा होती. यामध्ये तिने यश संपादन केले आहे. स्पर्धेमध्ये तिने प्रथम क्रमांक मिळविला असून, तिला सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. शाळेचे प्राचार्य संदीप साठे यांनी तिचे अभिनंदन केले. त्याच आकांक्षाला आर.के. बढे व अखिलेश यादव यांचे मार्गदर्शन लाभले.