शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

जळगावकर नागरिकांनी घडविले एकोप्याचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 12:01 IST

अयोध्या निकाल । ठिकठिकाणी होता पोलीस बंदोबस्त, बाजारपेठेत खरेदीचा उत्साह कायम

जळगाव : अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी शहरात बंधूभाव व एकोप्याचे दर्शन घडवून एक आदर्श निर्माण केला. इतकेच काय बाजारपेठेतील व्यवहारही रोजच्याप्रमाणे सुरु होते. मुख्य चौकासह ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता़ चौका चौकात वाहतूक पोलिसही थांबून होते़ दुसरीकडे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक स्थितीवर नियंत्रण ठेवून होते. रेल्वे स्थानकावर संशयित वस्तूंची तपासणी केली जात होती.या निकालाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शहरात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्वच नागरिकांनी आपले व्यवहार नेहमीप्रमाणे सुरु ठेवले. सुरक्षेचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले सकाळीच घराबाहेर पडले. त्यांनी संवेदनशील भागात भेटी दिल्यानंतर ११ वाजता थेट नियंत्रण कक्षाचा ताबा घेतला.दरम्यान, दाणा बाजारातील हमाल व्यावसायिकांनी सुरुवातीला ‘बंद’ ठेवण्याचा निर्णय घेतला होता. नंतर तो मागे घेतला, त्यामुळे दाणा बाजारातील व्यवहारही नेहमीप्रमाणे सुरु होते.धान्याचे ट्रकही रोजच्याप्रमाणे दाणा बाजारात दाखल झाले होते. दुपारच्या सत्रात ग्राहकांचे प्रमाण कमी होते. मात्र, सायंकाळी पुन्हा बाजारपेठ ग्राहकांनी फुलून गेली. दाणा बाजार, सुभाष चौक, गोलाणी मार्केट आदी परिसरात सर्व व्यवहार नियमितपणे सुरु होते.शाळा व महाविद्यालयांना सुटीशहरातील शाळा व महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती.अनेकांनी घरी अथवा रस्त्यावरील दुकानातील दूरदर्शन अथवा वृत्तवाहिन्यांवर हा निकाल पाहिला आणि त्यासाठी काही ठिकाणी लोकही उभे होते.देशातील एकतेचा विजयअयोध्या निकाल हा कुठल्याही धर्माचा विजय किंवा पराभव नसून हा सद्भावनेचा, एकतेचा, देशाचा विजय आहे़ असा सूर शहरातील मान्यवरांच्या सभेत उमटला़ निकालानंतर जी.एम फाऊंडेशन व जननायक फाऊंडेशनच्यावतीने यासदभावना सभेचे आयोजन करण्यात आले होते़ या सभेत आमदार सुरेश भोळे,करीम सालार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.बॅनर्स, प्रिंटर्स व जाहीरात एजन्सीला नोटीसया निकालाबाबतचे अभिनंदन किंवा निषेध असे कोणतेच प्रकारचे बॅनर्स, फ्लेक्स तयार करु नयेत तसेच त्याची प्रिंटीग करु नये यासाठी बॅनर्स व प्रिंटर्स चालकांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्याशिवाय बॅनरच्या जाहीरात एजन्सीलाही नोटीस बजावण्यात आली होती. सोशल मीडिया, जल्लोष, निषेध, मिरवणूक, गुलाल उधळणे याला निर्बंध घालण्यात आले होते.गुप्तचर यंत्रणाही अलर्टजिल्ह्यात सीमीचे जाळे, जातीय दंगलीचे ठिकाण, संवेदनशील शहर व गावे यांचे हॉटस्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. जळगाव, रावेर, भुसावळ, साकळी, अडावद येथे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले असून काही लोकांवर गुप्तचर व पोलीस यंत्रणेची नजर ठेवण्यात आली. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसासाठी जिल्ह्यात कलम १४४ प्रमाणे जमावबंद आदेश लागू केला आहे. या काळात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येणार नाही याची सूचना देण्यात आली आहे.रेल्वे स्टेशन व विमानतळावर हाय अलर्टविमानतळ,रेल्वे स्टेशन व बसस्थानकावर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. स्टेशनवर येणाºया रेल्वे गाड्यांची तसेच प्रवाशांकडील साहित्याची तपासणी केली जात होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव