शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 15:29 IST

Jalgaon Lightning Accident: अचानक पाऊस सुरू झाला. भिजू नये म्हणून ते झाडाच्या आश्रयाला गेले. ९ वर्षांच्या मुलासह तिघांना काळाने तिथेच गाठले अन् संपूर्ण कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. 

Chalisgaon Lightning Accident:चाळीसगाव तालुक्यात शेतातील झाडावर वीज कोसळून त्याखाली आश्रयाला थांबलेले एकाच कुटुंबातील तीनजण ठार झाले. या घटनेत इतर दोन जण जखमी झाले आहेत. ही हृदयद्रावक घटना कोंगानगर येथे १५ जून रोजी दुपारी २ वाजता घडली.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

दशरथ उदल पवार (वय २४), त्याचा पुतण्या दिलीप पवार (१४, दोघे रा. कोंगानगर) आणि शालक समाधान प्रकाश राठोड (९, रा. जेहूर ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा अशी मृतांची नावे आहेत. 

काही दिवसांपूर्वी झाले होते लग्न

मयत दशरथ याचा १५ दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. उदल गणपत पवार व दिलीप उदल पवार हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पवार कुटुंबीय गावानजीकच्या शेतात रविवारी कपाशी लागवड करण्यासाठी गेले होते. 

दुपारी दोन वाजता वादळी वाऱ्यासह पावसासह विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यामुळे सर्वजण शेतातील झाडाच्या आडोशाला उभे राहिले. काही क्षणातच झाडावर वीज कोसळल्याने तिघे जागीच ठार झाले.

मन हेलावणारा आक्रोश

एकाच कुटुंबातील तीनजणांचा मृत्यू झाल्याने कोंगानगरात शोककळा पसरली होती. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. रात्री उशिरा तीनही जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, नायब तहसीलदार संदेश निकुंभ, प्रथमेश मोहोड हे घटनास्थळी पोहोचले. आमदार चव्हाण यांनी शासनाकडून देण्यात येणाऱ्या मदतीबाबतही प्रशासनाला सूचना दिल्या.

टॅग्स :RainपाऊसthunderstormवादळDeathमृत्यूChalisgaonचाळीसगावAccidentअपघातJalgaonजळगाव