Jalgaon: सुरगाणा तालुक्यात पहाटे झालेल्या अपघातात ८ महिन्यांच्या बालकासह तीन ठार

By Suyog.joshi | Updated: April 30, 2023 11:27 IST2023-04-30T11:26:50+5:302023-04-30T11:27:07+5:30

Jalgaon News: सापुतारा मार्गावरील हिरीडपाडा येथे पहाटे ३ वाजेच्या सुमारास पिकअप वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन झाडावर आदळून झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून १३जण जखमी आहेत.

Jalgaon: Three, including an 8-month-old baby, were killed in an early morning accident in Surgana taluk | Jalgaon: सुरगाणा तालुक्यात पहाटे झालेल्या अपघातात ८ महिन्यांच्या बालकासह तीन ठार

Jalgaon: सुरगाणा तालुक्यात पहाटे झालेल्या अपघातात ८ महिन्यांच्या बालकासह तीन ठार

नाशिक : वणी -सापुतारा मार्गावरील हिरीडपाडा येथे पहाटे ३ वाजेच्या सुमारास पिकअप वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन झाडावर आदळून झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून १३जण जखमी आहेत. यापैकी ९ जणांची प्रकृती गंभीर आहे.हे सर्व जण गुजरातमधील आहेत.

गुजरात राज्यातील कामत येथील मजूर गेल्या चार महिन्यांपासून निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर येथील द्राक्ष बागायतदार भाऊसाहेब बुंटे यांच्याकडे काम करीत होते. द्राक्ष हंगाम संपल्याने आपल्या गावी जाण्यासाठी जोगबारी, कामात, नडगचोंड येथील मजूर शनिवारी रात्री बारा वाजता पिकअप (क्रमांक एमएच ४१ एयू ५३२१)ने निघाले. पहाटे तीन वाजेच्या सुमारास हिरीडपाडा (ता. सुरगाणा) येथील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या वडाच्या झाडावर वाहन धडकून दोन महिला व बालक जागीच ठार झाले.

या अपघातात अर्चना विशाल म्हसे (२०), मीना सोमा गुबांड (३०), रिहान विशाल म्हसे (८ महिने), सर्व राहणार जोगबारी ता.अहवा) हे जागीच ठार झाले तर १३ जण जखमी झाले. सुरगाणा ग्रामीण रुग्णालयामध्ये मृतांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

Web Title: Jalgaon: Three, including an 8-month-old baby, were killed in an early morning accident in Surgana taluk