जळगाव तालुक्यातील तरसोद येथे दोन गटात हाणामारी, १० जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 19:20 IST2018-03-11T19:20:37+5:302018-03-11T19:20:37+5:30

दगडफेकीनंतर गावात तणावपूर्ण शांतता

In Jalgaon taluka of Tarasod, two groups were injured and 10 others arrested | जळगाव तालुक्यातील तरसोद येथे दोन गटात हाणामारी, १० जणांना अटक

जळगाव तालुक्यातील तरसोद येथे दोन गटात हाणामारी, १० जणांना अटक

ठळक मुद्देहाणामारीत एकाचे डोके फुटले क्षुल्लक कारणावरून दोन गटात वाद

आॅनलाइन लोकमत
नशिराबाद, जि. जळगाव, दि. ११ - जळगाव तालुक्यातील तरसोद येथे क्षुल्लक कारणावरून दोन गटात वाद उफाळून आला, त्यावरून दगडफेक करीत काठ्यांचा वापर करून हाणामारी झाली. त्यात एका गटाच्या ८ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा तर दुस-या गटाच्या ३ जणांवर परस्परविरोधी गुन्हा नशिराबाद पोलिसात दाखल आहे. हाणामारीत एकाचे डोके फुटले असून जबर दुखापत झाली. एकूण दोन जण जखमी असून पोलिसांनी १० जणांना अटक केली आहे. ही घटना शनिवारी रात्री दहाच्या सुमारास तरसोद येथे बसस्थानक चौकात घडली. गावात तणावपूर्ण शांतता आहे.
अमोल गणेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, राहुल रामेश्वर राजपूत व अमोल पाटील यांच्यात ९ मार्चला क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्याचे पर्यावसान शनिवारी रात्री पुन्हा दोघांमध्ये शाब्दिक वाद उफाळून आला. माझ्या समाजाच्या लोकांसोबत राहतो यावरून वादाची ठिणगी पडल्याने सांगण्यात येते. राहुलने अमोल पाटील याच्या कानात मारली. दगडफेक करून दहशत निर्माण केली. लाठ्या-काठ्यांचा वापर झाल्याने दोन्ही गट आमने-सामने उभे ठाकले. त्यात गणेश विनायक पाटील यांचे डोक्यास जबर दुखापत झाली तर अमोल गणेश पाटील यांच्या हातास दुखापत झाली. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अमोश गणेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल रामेश्वर राजपूत (२४), हेमंत दिनकर राजपूत (३४), विनोद सुभाष राजपू (२९), सचिन सुनील राजपूत (२३), सागर सुनील राजपूत (१९), रामेश्वर मोतीलाल राजपूत (४२), मनोज सुनील राजपूत (२०), संतोष मोतीलाल राजपूत (४०) सर्व रा.तरसोद यांच्यावरून गुन्हा दाखल असून सर्वांना अटक केली आहे.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.टी.धारबळे, उपनिरीक्षक अशोक खरात, चेतन पाटील, गोकुळ तायड, युनूस शेख, गुलाब माळी, सायबु तडवी यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींना अटक केली.
दुसºया गटात दिलेल्या फिर्यादीत सोन्या उर्फ अमोल गणेश पाटील, कैलास लटकन पाटील (४५), रावसाहेब उर्फ वसंता अशोक पाटील (३१) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. माझ्याशी विवाह कर असे म्हणत अश्लील वर्तन केले. मारहाण केली अशी फिर्याद पीडित तरुणीने दिली आहे.

Web Title: In Jalgaon taluka of Tarasod, two groups were injured and 10 others arrested