जळगाव येथे आरोपीच्या अटकेसाठी रात्री ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 01:16 PM2018-06-14T13:16:24+5:302018-06-14T13:16:24+5:30

पोलीस ठाण्यात दीड तास गोंधळ

At Jalgaon stays in the night to arrest the accused | जळगाव येथे आरोपीच्या अटकेसाठी रात्री ठिय्या

जळगाव येथे आरोपीच्या अटकेसाठी रात्री ठिय्या

Next
ठळक मुद्देमृतदेह ताब्यात घेण्यास नकारमहिलांनी पोलीस यंत्रणेविषयी व्यक्त केला रोष

जळगाव - अक्षरा उर्फ छकुली नरेश करोसिया या बालिकेच्या मारेकऱ्याला अटक करावी या मागणीसाठी समता नगरमधील रहिवाशांनी रात्री ९ वाजता रामानंद नगर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून ठाण्याच्या आवारातच ठिय्या मांडला. १५ तासाचा कालावधी लोटला गेला तरी आरोपी सापडत नसल्याने महिलांनी पोलीस यंत्रणेविषयी रोष व्यक्त केला.
सामाजिक संघटना व विविध पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समता नगरमधील रहिवाशांना घेऊन रामानंद नगर पोलीस स्टेशनवर मोर्चा आणला. रात्री ९ ते १०.३० असा दीड तास महिलांनी ठिय्या मांडला. रिपाईचे अनिल अडकमोल यांनी समता नगरात कायमस्वरुपी पोलीस चौकी व आरोपीच्या अटकेची मागणी केली. आरोपीला अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही व अंत्यसंस्कारही करणार नाही अशी भूमिका रहिवाशांनी घेतली. चारशेच्यावर जमाव यावेळी जमला होता. पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी आरोपीला अटक केली जाईल, शिवाय मुलीच्या वडीलांची कारागृहातून सुटका व्हावी यासाठी अमरावती प्रशासनाशीसंपर्क करुन अहवाल दिला आहे असे सांगून त्याचा कागदच त्यांनी दाखविला. महापौर ललित कोल्हे यांनी यावेळी मध्यस्थी केली. मार्चेकरांमध्ये मुलीची आई, मावशी, भाऊ व अन्य नातेवाईक होते.

Web Title: At Jalgaon stays in the night to arrest the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.