‘सिंदूर’ शेती यशस्वी; एका झाडापासून ५० किलो कुंकू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 07:45 IST2025-06-09T07:44:11+5:302025-06-09T07:45:19+5:30
Jalgaon News: राजवड (ता. पारोळा) येथील शेतात ‘सिंदूर’ रोपांची यशस्वी लागवड करून माजी आमदार व कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी कृषी क्षेत्रात आगळावेगळा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांनी त्यांच्या राज फार्मवर १५ ऑगस्ट २०२३ रोजी सिंदूरच्या ३५ रोपांची लागवड केली होती.

‘सिंदूर’ शेती यशस्वी; एका झाडापासून ५० किलो कुंकू
- भूपेंद्र मराठे
पारोळा (जि. जळगाव) : राजवड (ता. पारोळा) येथील शेतात ‘सिंदूर’ रोपांची यशस्वी लागवड करून माजी आमदार व कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी कृषी क्षेत्रात आगळावेगळा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांनी त्यांच्या राज फार्मवर १५ ऑगस्ट २०२३ रोजी सिंदूरच्या ३५ रोपांची लागवड केली होती.
साधारणपणे ‘सिंदूर’ (नैसर्गिक कुंकू उत्पादन देणारे सिंदूर नावाचे झाड)चे उत्पादन हाती येण्यासाठी लागवडीच्या दिवसापासून ३ वर्षांचा कालावधी लागतो; परंतु लागवड केल्यापासून अवघ्या १५ महिन्यांतच प्रतिवृक्ष १ किलो याप्रमाणे ३५ किलो “सिंदूर”चे उत्पादन घेण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याची माहिती त्यांनी दिली. “सिंदूर”च्या झाडावर लालसर रंगाची फळे (गुच्छ) येतात. फळे कोरडी झाल्यावर बिया काढल्या जातात. या बिया नैसर्गिकरीत्या गडद लालसर रंगाच्या असतात. या बियांमध्ये नैसर्गिक रंगद्रव्य असते, जे सुरक्षित असते. बियांना सावलीत सुकवून नंतर बारीक दळून लालसर पावडर तयार केली जाते. हीच पावडर कुंकू म्हणून वापरली जाते.